Sanju Samson Saam Tv
Sports

Sanju Samson : सॅमसनची संधी पुन्हा हुकली; टीम इंडियात न घेण्याची काय आहेत कारणे?

Sanju Samson Team India : आज (१८ जानेवारी) बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात संजू सॅमसनला संधी न मिळाल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Yash Shirke

Sanju Samson : बीसीसीआयने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा केली. रोहित शर्माकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या भारतीय संघात काही खेळाडूंनी संघात कमबॅक केले आहे. तर काही खेळाडूंना डच्चू मिळाला आहे. डच्चू मिळालेल्या खेळाडूंमध्ये संजू सॅमसनही आहे. संघात संधी न मिळाल्याने त्याचे चाहते निराश झाले आहेत.

बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघामध्ये रिषभ पंत आणि के एल राहुल अशा दोन विकेटकिपर बॅट्समॅनची निवड केली आहे. या दोन खेळाडूंमुळे संजूला संघातून वगळण्यात आले असे म्हटले जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मुख्य विकेटकिपर म्हणून के एल राहुलला पहिली पसंती देण्यात आली होती. तर राहुलनंतर यष्टिरक्षणासाठी रिषभ पंत योग्य आहे असल्याचा मानस बीसीसीआयचा आहे, असे म्हटले जात आहे. तरीही संजूला संघात संधी का मिळाली नाही हे याचे खरं कारण समोर आलेले नाही.

दरम्यान संजू सॅमसन दुसऱ्या एका कारणामुळेही चर्चेत होता. संजू केरळकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने सहभाग घेतला नव्हता. त्याच्या या निर्णयामुळे गदारोळ माजला होता. विजय हजारे ट्रॉफीमध्ये न खेळल्यामुळे भारतीय संघात संजूची निवड झाली नाही असे चर्चा सुरु आहे.

संजू सॅमसनला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड न झाल्याने त्याच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महत्त्वपूर्ण स्पर्धांमध्ये संजूला संधी दिली जात नाही असे काहींनी म्हटले आहे. तर काही चाहत्यांनी सॅमसनवर बीसीसीआय नेहमी अन्याय करते असे म्हटले आहे.

कसा आहेत भारतीय संघ?

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, रविंद्र जडेजा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nalasopara: गटारावरील लोखंडी जाळीत महिलेचा पाय अडकला, जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल; VIDEO

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT