Suryakumar Yadav
Suryakumar Yadav Saam Tv
क्रीडा | IPL

Suryakumar Yadav:'सूर्यकुमार यादव टेस्टमध्ये हिट होऊ शकत नाही..'पाकच्या माजी क्रिकेटपटूचे खळबळजनक विधान

Saam TV News

Suryakumar Yadav:भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव हा आयसीसीच्या टी-२० फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. नुकताच ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती.

मात्र त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्याची ही कामगिरी पाहता, पाकिस्तान संघाचा माजी फलंदाज सलमान बट्टने मोठे वक्तव्य केले आहे.

सलमान बट्टचे म्हणणे आहे की, कसोटी क्रिकेटमध्ये टी-२० स्टाईल फलंदाजी करून काही होणार आहे. तसेच त्याने सूर्यकुमार यादवला सल्ला देत म्हटले की, सूर्यकुमार यादलवा जर यशस्वी व्हायचं असेल तर त्याला कसोटी क्रिकेट हा कसोटी क्रिकेटप्रमाणेच खेळावं लागेल. त्याला टी-२० स्टाईल फलंदाजी विसरावी लागेल. (Latest Sports Updates)

सूर्यकुमार यादवला नागपूर कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याला रवी शास्त्री यांनी पदार्पणाची कॅप दिली होती. मात्र या सामन्यात तो स्वस्तात बाद होऊन माघारी परतला होता. टी-२० क्रिकेटमध्ये अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर करणारा सूर्यकुमार यादव आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात फ्लॉप ठरला.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सलमान बट्ट याने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, 'असं कितीवेळा घडलं आहे की, एखाद्या फलंदाजाने एकाच सेशनमध्ये संपूर्ण सामना बदलून टाकला. गोलंदाजासाठी हे सोपं आहे कारण तो एकाच सेशनमध्ये ३-४ विकेट्स घेऊन सामना बदलू शकतो. मात्र फलंदाजाला वेळ लागतो. खूप कमी फलंदाज आहेत जे हा कारनामा करू शकतात. कारण कसोटी क्रिकेट हे वनडे आणि टी-२० क्रिकेटपेक्षा वेगळं आहे.'

तसेच तो पुढे म्हणाला की, 'सूर्यकुमार यादवकडे ते कौशल्य आहे. त्याला टी-२० स्टाईल फलंदाजी करण्याची काहीच आवश्यकता नाहीये. त्याला फक्त खेळपट्ट्टीवर वेळ घालवायचा आहे. भारतात पाकिस्तान सारखी सपाट खेळपट्टी नाहीये.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

Maharashtra Election: नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचं चेकिंग; चेकिंग नव्हे स्टंटबाजी, ठाकरे गटाचा आरोप

Swati Maliwal Assault Case : 'माझ्याबाबत जे घडलं ते,...; मारहाणीच्या घटनेनंतर आप नेत्या स्वाती मालीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

Mega block : मध्य रेल्वेवर आजपासून पंधरा दिवस ब्लॉक; कोणत्या मार्गांवर होणार परिणाम? जाणून घ्या

Maharahstra Election: अजित पवार गेले कुठे? अखेरच्या टप्प्यात अजित पवारांची प्रचाराकडे पाठ?

SCROLL FOR NEXT