Sachin Tendulkar on fake photos Saam Tv
Sports

माझ्या फोटोचा गैरवापर हे दुःखद; 'त्या' खोट्या फोटोंवर सचिन तेंडुलकर संतापला!

सचिनची टीम ही जाहिरात करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सध्या खोट्या जाहिरातींमुळे त्रस्त झाला आहे. कारण त्याचे काही फोटो सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. या फोटोमध्ये सचिन कॅसिनोची (Casino) जाहिरात करताना दिसत आहे. सचिनने या प्रकरणावर म्हटले आहे की, मी अशा गोष्टींना कधीही दुजोरा दिला नाही आणि या जाहिराती खोट्या आहेत. सचिनची टीम ही जाहिरात करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Sachin Tendulkar on fake photos)

सचिनने म्हटले आहे की, मी वैयक्तिकरित्या दारू, जुगार किंवा तंबाखूचे कधीही समर्थन केले नाही, माझ्या फोटोचा दुरूपयोग करणं दुःखद आहे. कॅसिनोच्या जाहिरातीबाबत स्पष्टीकरण देताना सचिनने एक ट्विट केले आहे. यामध्ये पोस्टमध्ये सचिनने लिहिले आहे की, "माझ्या लक्षात आले आहे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक जाहिराती दाखवल्या जात आहेत, ज्यामध्ये माझा चेहरा मॉर्फिंगद्वारे कॅसिनोची जाहिरात करताना दाखवण्यात आला आहे. मी वैयक्तिकरित्या कधीही या जाहिराती केल्या नाहीत. जुगार, दारू आणि तंबाखूचे कधीही समर्थन केले नाही. लोकांना भ्रमात पाडण्यासाठी माझ्या फोटोंचा गैरवापर केला जातो आहे. हे फार दुःखद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक! मध्य आणि हार्बर मार्गावर होणार परिणाम; घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहाच

Maharashtra News Live Update: Pune: पर्वती पायथा येथे अनेक वर्ष जुने असलेले वडाचे झाड पडले

१६७० मधील लढाईनं बदलला पुण्यातील 'या' डोंगरी किल्ल्याचा इतिहास

8th Pay Commission: शिक्षकांचा पगार किती वाढणार? किती मिळणार पेन्शन?

शिंदेंच्या गुंड नगरसेवकाची डॉक्टरांना मारहाण प्रकरणानंतर राजकारण तापलं; राज ठाकरेंच्या शिलेदाराची KDMC मध्ये धडक

SCROLL FOR NEXT