Rubina Francis Saam Digital
Sports

Rubina Francis : रुबिनाने भारताला नेमबाजीत दिलं चौथं मेडल, कांस्य पदकावर साधला निशाणा; कोण आहे रुबिना? वाचा सविस्तर

Paralympics 2024/ Paris Paralympics Games Paris 2024 : पॅरालिम्पिकमध्ये रुबिना फ्रान्सिसने 10 मीटर एअर पिस्टलमध्ये आणखी एका पदकाची कमाई केली आहे. भारताचं नेमबाजीतील हे ४ पदक आहे. :

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पॅरालिम्पिकमध्ये रुबिना फ्रान्सिसने 10 मीटर एअर पिस्टलमध्ये आणखी एका पदकाची कमाई केली आहे. भारताचं नेमबाजीतील हे ४ पदक आहे. रुबिना फ्रान्सिसने 10 मीटर एअर पिस्टमध्ये आजच फायनलमध्ये धडक दिली होती. सायंकाळी ६.१५ वाजता हा फायनल सामना झाला. अंतिम फेरीत २११.१ गुणांसह ती तिसऱ्या क्रमांकावर राहिली.

१० मीटर एअर पिस्टल SH 1 प्रकारात रुबिनाने कांस्य पदकाची कमाई केली. रुबिनाने पात्रता फेरीत ९०, ९०,९५, ९२, ९५९४ असे एकूण ५५६-१३x गुणांसह सहाव्या क्रमांकावर राहत अंतिम फेरी गाठली होती. शुक्रवारचा दिवस भारतासाठी खास राहिला कारण अवनी लेखराने सुवर्णपदक, मोना अगरवालने १० मीटर एअर रायफल स्टॅन्डिंग SH1 प्रकारात कांस्य आणि मनिष नरवाल रुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल SH1 प्रकारात रौप्य पदक जिंकलं आहे.

कोण आहे रुबिना ?

रुबिना फ्रान्सिस भारतीय पॅरा-शूटर आहे. तिने नेमबाजीत पॅरा-शूटिंग प्रकारात महत्त्वपूर्ण भारतासाठी मोठं योगदान दिलं आहे. तिने पॅरा ऑलिम्पिकसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2021 मधील पॅरा नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल SH1 स्पर्धेत जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: मुंडकं छाटलं, दोन्ही हात तोडले; निर्जनस्थळी फेकला मृतदेह, ठाण्यातील हत्याकांडानं महाराष्ट्र हादरला

Ind vs Eng : दुसऱ्या वनडेत भारताचा धक्कादायक निर्णय; मॅचविनर खेळाडू संघाबाहेर; प्लेइंग ११ कशी आहे?

Maharashtra News Live Update : बीडमध्ये गूढ आवाजाने खळबळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट होणार? बड्या नेत्याच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात उठली वावटळ

Anganwadi Bharti 2026: राज्यातील १ लाख अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस, जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT