rr vs rcb twitter
Sports

RR VS RCB Match Result: बंगळुरूचा राजस्थानवर सर्वात मोठा विजय; प्ले ऑफच्या शर्यतीत मोठी झेप,असे असेल समीकरण

RR VS RCB Highlights: या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

RR VS RCB IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत आज डबल हेडर सामान्यांचा थरार रंगणार आहे. पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये पार पडला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला ११२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला विजय मिळवण्यासाठी १७२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघ ५९ धावांवर ऑल आउट झाला आहे.

हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने या सामन्यात विजय मिळवत राजस्थान रॉयल्स संघाची झोप उडवली आहे. या सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्स संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी होता.

मात्र आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मिळवलेल्या जोरदार विजयानंतर राजस्थान रॉयल्स सहाव्या स्थानी घसरला आहे. तर राजस्थान रॉयल्स संघ पाचव्या स्थानी पोहोचला आहे. सध्या दोघांचे गुण १२-१२ आहेत.

मात्र ११२ धावांनी मिळवलेल्या विजायामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा नेट रन रेट वाढला आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला देखील प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी असणार आहे. (Latest sports updates)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा जोरदार विजय...

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून प्रथम फलंदाजाई करताना कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली. तर ग्लेन मॅक्सवेलने ५४ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ५ गडी बाद १७१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाकडून शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली.

तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून गोलंदाजी करताना पार्नेलने सर्वाधिक ३ तर मायकेल ब्रेसवेलने २ गडी बाद केले. राजस्थान रॉयल्स संघाचा डाव अवघ्या ५९ धावांवर संपुष्ठात आला.

या सामन्यात अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, केएम आसिफ, युझवेंद्र चहल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल, वेन पारनेल, कर्ण शर्मा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT