IPL 204 Latest  
Sports

IPL 2024: पहिल्या सामन्याआधीच RCBमध्ये बदल; बदललं नाव अन् लोगो

IPL 204 Latest News: आयपीएलच्या आगामी हंगामासाठी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण वेळापत्रक अद्याप समोर आलेले नाही.

Bharat Jadhav

Royal Challengers Bengaluru :

आयपीएलच्या १७व्या हंगामाला २२ मार्चपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. पहिला सामना जिंकून दोन्ही संघ विजयाचा श्रीगणेशा करण्याच्या तयारीत मैदानात उतरेल. पहिला विजय आपलाच होण्यासाठी आरसीबी पूर्ण तयारीला लागलीय. याची सुरुवात संघाने नावातील बदलाने केलीय. सामन्याआधी आरसीबीच्या संघाचे नाव आणि लोगो बदलण्यात आलाय. (Latest News)

आता आरसीबीच्या संघाचे नाव 'रॉयल चॅलेंजर्स बँगलोर'च्या ऐवजी 'रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू' असे असणार आहे. संघाचं फक्त नाव नाही तर आरसीबीच्या फ्रँचायझीने नवा लोगो देखील जाहीर केलाय. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण वेळापत्रक अद्याप समोर आलेले नाही. आयपीएल २०२४ ला २२ मार्चपासून सुरू होणार आहे आणि पहिल्या १७ दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

सीएसकेसाठी वाईट बातमी

धोनीच्या नेतृत्त्वात उतरणाऱ्या सीएसके संघासाठी एक वाईट बातमी संघाचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि युवा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना दुखापतीमुळे पहिला सामना खेळू शकणार नाहीत. न्यूझीलंडचा फलंदाज कॉनवेने गेल्या वर्षी ६०० धावा केल्या होत्या, ज्यामुळे तो CSKचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला होता. मथीशा पथिरानाची बॉलिंग स्टाईल काहीशी श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज 'लस्सिथ मलिंगा' याच्यासारखी आहे.

बुकिंग कसं करायचं?

तिकीच बुक कसं करायचं आणि तिकिटांची किंमत किती असेल? जाणून घ्या. या सामन्यासाठीचं तिकीट तुम्ही पेटीएम इनसाइडर किंवा बुक माय शो अॅपवरुन बुक करु शकता. हा सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर रंगणार आहे. सर्वात स्वस्त तिकीट १७०० रुपये इतकं आहे. हे तिकीट सी लोव्हर, डी लोव्हर आणि इ लोव्हरचं असणार आहे. तर या तिकिटांची किंमत ४५०० पर्यंत जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर महत्वाची बैठक सुरू

Maharashtra News Live Update: उजनी धरणातील पाण्याचे ऑगस्टपर्यंत नियोजन

Gold Rate Today: अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; सुवर्णनगरीतील २२ अन् २४ कॅरेटचे दर किती?

CBSE Class 12 Result 2026: बारावीचा निकाल कधी लागणार? मोठी अपडेट समोर; मोबाइलवर रिझल्ट कसा पाहाल?

Bigg Boss Marathi 6: 'मला राकेश बापटच्या मुलांची आई व्हायचंय...'; राखी सावंतचं व्यक्त केली धक्कादायक इच्छा

SCROLL FOR NEXT