rohit sharma twitter
Sports

Rohit Sharma Daughter Video Fact Check: रोहितच्या लाडक्या लेकीचा व्हायरल होत असलेला VIDEO फेक, काय आहे सत्य?

Samaira Given Update Of Rohit Sharma Video Fake: रोहितची मुलगी समायराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. ज्यात ती रोहितबाबत अपडेट देताना दिसून येत आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma Daughter Video Fact Check:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवामुळे कोट्यवधी क्रिकेट चाहते निराश झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माला अश्रू अनावर झाले होते. तो अश्रू लपवत मैदानाच्या बाहेर जाताना दिसून आला होता.

या पराभवानंतर रोहितने कुठलीही पोस्ट केलेली नाही. दरम्यान रोहितची मुलगी समायराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. ज्यात ती रोहितबाबत अपडेट देताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ खरा आहे की खोटा जाणून घ्या.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रितिका आणि समायरा बिल्डिंगमधून बाहेर येताना दिसून येत आहे. त्यावेळी तिला रोहितबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर समायरा उत्तर देताना दिसून येत आहे.

समायराला विचारलं गेलं होतं की,तुझे बाबा (रोहित शर्मा) आता कसे आहेत? या प्रश्नाचं उत्तर देत ती म्हणाली की,' ते आहेत. जवळपास एक महिन्यानंतर ते पुन्हा एकदा हसू लागतील.' समायराचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ खरा की खोटा?

व्हा व्हिडिओ भारतीय संघाच्या पराभवानंतर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. हाच व्हिडिओ दिड वर्षांपूर्वी ही व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ जून २०२२ चा आहे. त्यावेळी भारतीय संघ इंग्लंडविरुद्धचा एकमेव कसोटी सामना खेळण्यासाठी इंग्लंडला गेला होता. (Rohit Sharma Daughter Video)

या सामन्याच्या काही दिवसांपूर्वीच रोहितला कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे हा व्हिडिओ खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे. (Latest sports updates)

वर्ल्डकप फायनलमध्ये भारतीय संघाचा पराभव..

फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना केएल राहुलने सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली. तर विराटने अर्धशतकी खेळी केली.

रोहित या सामन्यात ४७ धावा करत माघारी परतला होता. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २४० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ट्रेविस हेडने १३७ धावांची खेळी करुन संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

SCROLL FOR NEXT