Team India  Saam Tv
Sports

IND VS AUS 3rd Test:इंदोर कसोटीत राहुल नव्हे तर 'या'खेळाडूला मिळणार डच्चू, पहिल्या २ सामन्यात रोहीतसाठी ठरलाय डोकेदूखी

भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मधून कोण बाहेर जाणार आणि कोण आत येणार ही चर्चा सुरु आहे. दरम्यान केएल राहुलसह आणखी एक खेळाडू आहे,जो तिसऱ्या कसोटी सामनातून बाहेर होऊ शकतो.

Saam TV News

IND VS AUS 3rd Test: बॉर्डर- गावसकर ट्रॉफीतील पहिल्या २ सामन्यांमध्ये भारतीय संघाने जोरदार कामगिरी केली आहे. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने २-० ची आघाडी घेतली आहे.

तर मालिकेतील तिसरा कसोटी सामना १ मार्चपासून इंदोरच्या होळकर स्टेडियमवर पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मधून कोण बाहेर जाणार आणि कोण आत येणार ही चर्चा सुरु आहे. दरम्यान केएल राहुलसह आणखी एक खेळाडू आहे,जो तिसऱ्या कसोटी सामनातून बाहेर होऊ शकतो. (Latest Sports Updates)

भारतीय संघात स्थान मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते. एकदा संधी मिळाली की त्या संधीचं सोनं करावंच लागतं. कारण एकदा संघाबाहेर झालं की पुन्हा पुनरागमन करणं खूप कठीण आहे.

ऑस्ट्रेलियाविरुध्द सुरु असलेल्या कसोटी मालिकेत यष्टिरक्षक फलंदाज म्हणून केएस भरतला संधी दिली गेली होती. या संधीचा त्याला पुरेपूर फायदा घेता आला नाहीये. त्यामुळे १ मार्चपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता खुप कमी आहे.

रिषभ पंतचा अपघात झाल्यामुळे तो येणारे काही महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केएस भरतला संधी दिली गेली आहे. मात्र या संधीचा त्याला फायदा घेता येत नाहीये.

दिल्ली आणि नागपूर कसोटीत त्याला फलंदाजी करताना धावा करता आल्या नाही. तसेच फिरणाऱ्या खेळपट्टीवर तो यष्टिरक्षण करताना देखील अडचणींचा सामना करताना दिसून आला.

केएस भरतची ही कामिगिरी पाहता तिसऱ्या कसोटीत ईशान किशनला भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते. भारतीय संघातील खालच्या फळीतील फलंदाज देखील फलंदाजीत मोलाचे योगदान देत आहेत. त्यामुळे ईशान किशनसारखा आक्रमक फलंदाज जर संघात आला तर नक्कीच भारतीय संघाची फलंदाजी आणखी मजबूत होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रानडुकरांच्या हैदोसामुळे शेतकऱ्याचे उभे केळीचे पीक जमीन दोस्त

डायबिटीजमध्ये किवी खावा की नाही? रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी 'हे' फळ ठरेल फायदेशीर

RCB vs GT IPL 2026 Final: कोण जिंकणार आयपीएल २०२६चा कप? RCB आणि GT मधील महसंग्राम कुठे, केव्हा आणि कसा पहाल?

Maharashtra Farmer Loan : १० दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, राज्य सरकारची मोठी घोषणा

Actress Bath Video Leak: अभिनेत्रीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ लीक', टिव्ही शोमध्ये घडला भयानक प्रकार

SCROLL FOR NEXT