Jasprit bumrah and Rohit sharma  file photos
Sports

Cricket News: 'आम्हाला आता त्याची गरज नाही..' बूमराहच्या जागी रोहित या २३ वर्षीय गोलंदाजाला खेळवणार वर्ल्ड कप

Jasprit Bumrah Injury: दुसऱ्या वनडे सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने जसप्रीत बुमराहबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

Ankush Dhavre

Rohit sharma Statement: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा गेल्या ८ महिन्यांपासून भारतीय संघाच्या बाहेर आहे. ऑस्ट्रेलिया विरुध्द झालेला सामना हा त्याचा शेवटचा सामना ठरला होता.

त्यानंतर त्याने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुखापतग्रस्त असल्याने त्याला पुनरागमन करता आले नव्हते.

दरम्यान दुसऱ्या वनडे सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने जसप्रीत बुमराहबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारत संघाने जोरदार कामगिरी करत विजय मिळवला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. (Latest sports updates)

या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माला जसप्रीत बुमराहबाबत प्रश्न विचारला गेला होता.

याबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, "बुमराह गेल्या ८ महिन्यांपासून संघाबाहेर आहे. त्याची कमतरता तर जाणवतेय. मात्र आता आम्हाला सवय झाली आहे. मला वाटतं की, सिराज, शार्दुल आणि शमीने चांगली गोलंदाजी केली आहे. आमच्याकडे उमरान आणि उनाडकट देखील आहे.

काही दिवसांपूर्वीच जसप्रीत बुमराहच्या पाठीच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे.

मात्र तो काही महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. त्यामुळे तो आगामी आयपीएल स्पर्धेत देखील खेळताना दिसून येणार नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli : यंदा दिवाळीला काढा फुलांची रांगोळी, घर दिसेल सुंदर अन् लोक करतील भरपूर कौतुक

Maharashtra Live News Update: बिद्री साखर कारखाना कर्मचाऱ्यांना दहा टक्के पगारवाढ लागू,

निलेश घायवळ प्रकरणात २ बड्या राजकीय नेत्यांची नावं, रोहित पवारांच्या आरोपांनी खळबळ | VIDEO

Politics : निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का? २ मित्रपक्ष साथ सोडण्याच्या तयारीत, चर्चांना उधाण

Jalgaon Crime : कॉफी शॉपमध्ये पोलिसांची धाड; तरुण- तरुणी सापडले नको त्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT