Rohit Sharma Century SAAM TV
Sports

IND VS AUS 4th test: हिटमॅन इज बॅक! जे गावसकर - अझहरुद्दीनलाही नाही जमलं; तेच करत हिटमॅनने रचला इतिहास

दुसऱ्या दिवशी रोहित शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

Ankush Dhavre

Ind vs Aus 4th test Rohit sharma record: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४८० धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात भारतीय संघाने देखील चांगली सुरूवात केली आहे. दरम्यान दुसऱ्या दिवशी रोहित शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. (Latest sports updates)

भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. दरम्यान रोहित शर्माने ३० धावा पूर्ण करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. असा कारनामा करणारा तो सातवा भारतीय फलंदाज ठरला आहे.

तर सुनील गावसकरांनी आपल्या कारकीर्दीत १३,२१४ धावा केल्या होत्या. तर मोहम्मद अझहरुद्दीन यांनी १५,५९३ धावा केल्या होत्या.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज..

सचिन तेंडुलकर -३४,३५७ धावा

विराट कोहली - २५,०४७ धावा

राहुल द्रविड -२४,२०८ धावा

सौरव गांगुली -१८,५७५ धावा

एमएस धोनी - १७,२६६ धावा

वीरेंद्र सेहवाग -१७,२५३ धावा

रोहित शर्मा - १७,००० धावा*

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cholesterol Symptoms: शरीराच्या या 3 भागांमध्ये सर्वात आधी दिसतात हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणं

Maharashtra News Live Update: TET पेपरफुटी प्रकरणी आणखी तिघांना अटक, आरोपींची संख्या 10 वर

संतापजनक कृत्य! सहकाऱ्याच्या गुदद्वारात कॉम्प्रेसरचा पाइप घातला,पोटात हवा गेल्यानं कामगाराचा मृत्यू

Running Benefits: वजन कमी करायचं आहे? मग दररोज ३० मिनिटं धावण्याची सवय लावा, शरीराला होतील हे ७ फायदे

Rain Health Tips: पावसात भिजल्यानंतर कोणते आजार होऊ शकतात?

SCROLL FOR NEXT