Rohit Sharma x
Sports

२०२७ चा वर्ल्डकप खेळणार, ट्रॉफी जिंकणार; रोहित शर्माने मराठीत चिमुकल्या फॅन्सला दिलं आश्वासन

Rohit Sharma : रोहित शर्माने एका कार्यक्रमादरम्यान २०२७ चा वर्ल्डकप खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मेक-अ-विश फाउंडेशनला दिलेल्या भेटीदरम्यानचा रोहितचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Yash Shirke

  • रोहित शर्माचा नवा व्हिडीओ व्हायरल

  • चाहत्याला वर्ल्डकपमध्ये खेळण्याचं दिलं वचन

  • निवृत्तीच्या चर्चांना मिळालं पूर्णविराम

Rohit Sharma Video : टी-२० नंतर टेस्ट क्रिकेटमधून रोहित शर्माने निवृत्ती घेतली आहे. मागील काही दिवसातील क्रिकेट जगतातील घडामोडी पाहता वनडे क्रिकेटमधूनही रोहित लवकर निवृत्ती घेईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. निवृत्तीच्या चर्चा सुरु असताना रोहितचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. या व्हिडीओमुळे रोहितच्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

मेक-अ-विश फाउंडेशनला दिलेल्या भेटीदरम्यान रोहितने २०२७ चा वर्ल्डकप खेळेन आणि भारताला ट्रॉफी जिंकण्यास मदत करेन असे एका चाहत्याला उद्देशून म्हटले. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओ तरुण चाहता रोहितला तुम्ही पुढच्या वर्ल्डकपपर्यंत खेळणार ना? असा प्रश्न विचारला. त्यावर रोहितने हसत-हसत 'मी वर्ल्डकपपर्यंत खेळत राहणार आहे आणि ट्रॉफी जिंकण्यापूर्वी पूर्ण प्रयत्न करेन' असे म्हटले. हा व्हिडीओ रोहित शर्माने मेक-अ-विश फाउंडेशनला सप्टेंबर महिन्यात दिलेल्या भेटीदरम्यानचा आहे.

२०२३ मध्ये भारतात वनडे वर्ल्डकपचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भारतीय संघाने सर्व सामने जिंकले पण शेवटचा अंतिम सामना त्यांनी गमावला. हा पराभव रोहित शर्मासह त्याच्या असंख्य चाहत्यांना जिव्हारी लागला. कर्णधार, सलामीवीर आणि खेळाडू म्हणून त्याने वनडे वर्ल्डकप जिंकण्यासाठी खूप मेहनत घेतली होती.

या पराभवानंतर रोहितने भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी-२० वर्ल्डकप जिंकवून दिला. आता त्याला भारताला वनडे वर्ल्डकप जिंकवून द्यायचा आहे. २०२७ च्या वनडे वर्ल्डकपसाठी रोहित शर्माने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. आगामी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी त्याने फिटनेसवर काम केले आहे. त्याने काही दिवसात जवळपास १० किलो वजन कमी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल

Success Story: १०वी-१२वीत टॉपर; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; IFS आदिती यांचा प्रेरणादायी प्रवास

Nashik Accident: दिंडोरीत भीषण अपघात; कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू

किडनी विकणाऱ्या शेतकऱ्याला हवं इच्छामरण; जीवंतपणीच्या मरणयातना कधी थांबणार? VIDEO

शिवसेनेच्या इतिहासावरून नाईकांचा शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोला; एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांचा वाद पुन्हा पेटणार?

SCROLL FOR NEXT