Robin_Uthappa PTI
Sports

Robin Uthappa Fraud Case: पीएफ घोटाळ्यावर रॉबिन उथप्पाची पहिली प्रतिक्रिया; "माझ्याकडे संचालकपद होतं, पण..."

PF Case Robin Uthappa: सोशल मीडियावर पोस्ट करत रॉबिन उथप्पाने घोटाळा प्रकरण आणि अटक वॉरंटवर भाष्य केले.

Saam Tv

भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पावर पीएफसंबंधित मोठा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला. उथप्पाविरोधात अटक वॉरंटदेखील निघाले. या घोटाळा प्रकरणावर त्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. रॉबिन उथप्पाने सोशल मीडियाद्वारे स्वत:ची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत घोटाळ्यामध्ये सहभागी नसल्याचे वक्तव्य केले आहे.

शुक्रवारी अटक वॉरंट निघाल्यानंतर काही तासांमध्येच रॉबिन उथप्पाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्याने "माझ्या विरोधात सुरु असलेल्या पीएफ प्रकरणाबाबत काही मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकत स्पष्टीकरण देऊ इच्छितो. स्ट्रॉबेरी लेन्सेरिया प्रायव्हेट लिमिटेड, सेंटॉरस लाईफस्टाइल ब्रँड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि बेरीझ फॅशन हाऊस या संस्थांमध्ये माझा सहभाग होता. या संस्थांना कर्जस्वरुपातील आर्थिक योगदान मी केले होते. २०१८-१९ मध्ये या कंपन्याच्या संचालकपदी माझी नियुक्ती झाली होती. पण त्या ठिकाणी माझा सक्रिय सहभाग नव्हता, माझी कार्यकारी भूमिका नव्हती. शिवाय एक क्रिकेटपटू, समालोचक म्हणून कार्यरत असल्याने कंपनीच्या कामांसाठी माझ्याकडे वेळ नव्हता. खरं तर, कर्ज दिलेल्या कोणत्याही कंपनीमध्ये मी कोणतीही कार्यकारी भूमिका बजावत नाही." असे म्हटले.

पुढे उथप्पाने "मी कर्ज म्हणून दिलेला निधी परत करण्यास या कपंन्या अयशस्वी ठरल्या. नाईलाजाने मला त्यांच्याविरोधात कारदेशीर कार्यवाही करावी लागली. तेव्हाच मी माझ्या संचालकपदाचा राजीनामाही दिला होता." स्पष्टीकरण दिले.

"ज्यावेळस पीएफ अधिकाऱ्यांनी थकबाकी देण्याची नोटीस दिली. तेव्हा मी या प्रकरणाविषयी माझ्या टीमशी चर्चा केला. आर्थिक व्यवहारामध्ये माझा सहभाग नसल्याची पृष्टी करणारी कागदपत्रे कंपन्यांनी प्रदान केली होती. तेव्हा पीएफबाबत आपली कोणतीही भूमिका नसल्याचे माझ्या कायदेशीर टीमने स्पष्ट केले. असे असूनही भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) पदाधिकाऱ्यांनी माझ्याविरोधात अटक वॉरंट जारी केले. येत्या काही दिवसांमध्ये या प्रकरणावर आम्ही आवश्यक निर्णय घेऊ. दरम्यान पीएफ घोटाळ्याबाबतची सत्यता तपासावी आणि संपूर्ण तथ्ये सादर करावी अशी विनंतीही मी प्रसारमाध्यमांना करतो." असे म्हणत उथप्पाने आरोपांचे खंडण केले.

रॉबिन उथप्पा संचालकपदी असताना कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यांमधून पीएफची रक्कम वजा झाली होती. ही रक्कम त्यांच्या पीएफ खात्यांमध्ये जमा झाली नसल्याचे म्हटले जात आहे. हा पीएफचा घोटाळा २३ लाख रुपयांचा आहे, असे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhurandhar 2 Collection : जगभरात 'धुरंधर 2'चा धुमाकूळ; 1,400 कोटींच्या उंबरठ्यावर, रणवीर सिंहने रचला इतिहास

Maharashtra Live News Update: जळगावातील ग्रामीण भागात एलपीजी संकट, गॅस पंपावर ऑटो रिक्षा चालकांची गर्दी

Blood Pressure: ब्लड प्रेशर तपासताना या चूका करणं लगेचच थांबवा, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Ashok Kharat: खरात प्रकरणामुळे अजित पवार गटातील आणखी एक महिला नेत्या विरोधकांच्या रडारवर; राजीनाम्याची केली मागणी

Elphistone Bridge: मध्य रेल्वेवर ६ दिवस मेगा ब्लॉक; लोकलचं वेळापत्रक बदलणार; तुमच्यावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT