Rishabh Pant Health Update Latest : भीषण अपघातात जखमी झाल्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असलेला क्रिकेटपटू रिषभ पंतच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. लवकरच रिषभला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो.
मुंबईत रिषभ पंतवर (Rishabh Pant) यशस्वी शस्त्रक्रिया झाली. सध्या पंत हा डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, पंतवर दोन लिगामेंट शस्त्रक्रिया झाल्या असून, त्या यशस्वी झाल्या आहेत. पंतला झालेल्या इतर जखमा लवकरच बऱ्या होतील, अशी डॉक्टरांना अपेक्षा आहे. टीम इंडियाचा (Team India) महत्वाचा खेळाडू असलेला रिषभ पंत याला रुग्णालयातून लवकरच डिस्चार्ज मिळू शकतो, असेही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
पंतला दोन आठवड्यांनंतर रुग्णालयातून (Hospital) डिस्चार्ज मिळू शकतो, त्यानंतर त्याचा रिहॅबचा प्लान तयार करण्यात येणार आहे. पुढील दोन महिन्यांत त्याचा रिहॅब सुरू होणार आहे. लिगामेंट ठीक होण्यासाठी चार ते सहा आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यानंतर पंतचा रिहॅब सुरू होईल. तो खेळू शकेल की नाही हे दोन महिन्यांनंतर ठरवले जाईल.
ही खूपच कठीण प्रक्रिया आहे. हे पंतला सुद्धा ठाऊक आहे. त्याचं काउन्सलिंगही होणार आहे. पंतला क्रिकेटच्या (Cricket) मैदानात उतरण्यासाठी किमान चार ते सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असे सांगितले जात आहे.
३० डिसेंबर २०२२ रोजी रिषभ पंतच्या कारला भीषण अपघात (Rishabh Pant Accident) झाला होता. यात तो जखमी झाला होता. त्याला देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर एअरलिफ्ट करून मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्याच्या दोन लिगामेंट शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्या यशस्वी झाल्या आहेत.
रिषभ पंतने अपघातानंतर पहिल्यांदाच ट्विट करत बीसीसीआय, टीम इंडिया आणि सहकारी खेळाडू, चाहत्यांचे आभार मानले होते. ज्यांच्यामुळे जीव वाचला त्या दोघांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पंतनं एक खास ट्विट केलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.