ms-dhoni  saam tv news
क्रीडा

IPL 2024: धोनीनंतर 'हा' भारतीय खेळाडू होणार CSK चा कर्णधार; माजी क्रिकेटपटूचा मोठा दावा

Ankush Dhavre

CSK Captain After MS Dhoni:

चेन्नई सुपर किंग्ज हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने आतापर्यंत ५ वेळेस आयपीएलच्या ट्रॉफीवर कब्जा केला आहे. २००८ पासून ते २०२३ पर्यंत एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्ज संघाचं नेतृत्व केलं आहे. २०२२ मध्ये त्याने या संघाचं नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला होता.

त्याच्या जागी रविंद्र जडेजाला संघाचं कर्णधारपद दिलं गेलं होतं. मात्र जडेजाला ही जबाबदारी व्ययस्थितरित्या पार पाडता आली नाही. त्यामुळे पु्न्हा एकदा एमएस धोनीने नेतृत्वाची जबाबदारी स्विकारली.

आगामी हंगामात एमएस धोनी खेळताना दिसणार आहे. हा त्याचा शेवटचा हंगाम असू शकतो. दरम्यान असा धोनीनंतर संघाचा कर्णधार कोण होणार असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

धोनीनंतर कोण होणार चेन्नईचा कर्णधार?

धोनीनंतर कोण होणार चेन्नईचा कर्णधार याबाबत बोलताना माजी भारतीय क्रिकेटपटू दिपदास गुप्ता म्हणाले की,'जर आयपीएल २०२५ स्पर्धेपर्यंत रिषभ पंत चेन्नईच्या संघात आला तर आश्चर्य वाटायला नको.

पंत आणि एमएम धोनी हे दोघेही एकमेकांच्या खूप जवळचे आहेत. रिषभला तो (धोनी) आवडतो आणि धोनीला ही रिषभ आवडतो. दोघांनी एकत्र भरपूर वेळ घालवला आहे. दोघांचे विचारही सारखेच आहेत.' (Latest sports updates)

रिषभ केव्हा करणार कमबॅक?

दिपदास गुप्ता यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. क्रिकेट फॅन्स रिषभ पंतला पिवळ्या रंगाच्या जर्सीत खेळताना पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र हे आयपीएल २०२४ स्पर्धेत पाहायला मिळणार नाही. कारण आयपीएल २०२४ स्पर्धेत एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे.

दुसरीकडे रिषभ पंत दुखपातीमुळे आयपीएल २०२३ स्पर्धा खेळू शकला नव्हता. मात्र आयपीएल २०२४ स्पर्धेत तो खेळताना दिसेल, असं दिल्ली कॅपिटल्स संघाचे डायरेक्टर यांनी स्पष्ट केलं आहे. त्याच्या फिटनेसमध्ये सुधार झाला असून तो आगामी आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचं नेतृत्वही करेल, असं सौरव गांगुली यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT