Mahendra Singh Dhoni saam tv
Sports

Mahendra Singh Dhoni: रिटेन की रिटायर? यंदाची IPL धोनी खेळणार? CSK च्या रिटेंशन लिस्टकडे चाहत्यांचं लक्ष

IPL 2027 retention list: आयपीएल 2027 साठी चेन्नई सुपर किंग्स कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार? एमएस धोनीचं नाव यादीत असेल का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. धोनीच्या आयपीएलमधील भविष्याबाबत चेन्नईच्या निर्णयातून महत्त्वाचे संकेत मिळण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) पुढच्या सिझनसाठी म्हणजेच आयपीएल 2027 साठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत आयपीएलमधील सर्व 10 टीम्सना त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे. यामुळे चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

आयपीएल 2027 साठी कोणते खेळाडू टीममध्ये कायम राहणार आणि कोणत्या खेळाडूंना सोडलं जाणार, याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना आहे. पण सर्वाधिक चर्चा चेन्नई सुपर किंग्सच्या रिटेन खेळाडूंच्या यादीची सुरू आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे एमएस धोनी.

धोनीला दुखापतीमुळे आयपीएल 2026 चा एकही सामना खेळता आला नव्हता. आता पुढील सिझनमध्ये तो खेळणार की नाही याबाबत धोनीने अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. चेन्नई सुपर किंग्सकडूनही याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही. धोनी सध्या 45 वर्षांचा आहे. येत्या 7 जुलैला तो 46 वर्षांचा होणार आहे.

आयपीएलमधील स्पर्धाही अधिक कठीण होत चालली आहे. अशा परिस्थितीत पुढील सिझनपर्यंत 46 वर्षांचा होणारा धोनी मैदानात उतरणार का? त्याला आणखी एक सिझन खेळायचा आहे का? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. या प्रश्नांची उत्तरं चेन्नईच्या रिटेन खेळाडूंच्या यादीतून मिळू शकतात.

मंगळवारी जाहीर होणाऱ्या यादीत धोनीचं नाव असेल तर पुढील सिझनमध्येही तो खेळताना दिसण्याची शक्यता कायम राहील. पण या यादीत त्याचं नाव नसेल तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरचा त्याचा आयपीएलमधील प्रवासही थांबू शकतो. त्यामुळे सर्व 10 टीमच्या रिटेन खेळाडूंच्या यादीपेक्षा चेन्नईच्या यादीची आणि त्यात धोनीचं नाव आहे की नाही, याची चाहत्यांना अधिक उत्सुकता आहे.

एमएस धोनी हा चेन्नई सुपर किंग्सचा सर्वात मोठा चेहरा मानला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आतापर्यंत 5 वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. चेन्नईकडून सर्वाधिक रन्स करणाऱ्या खेळाडूंमध्येही धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

धोनीने 2008 ते 2025 या काळात चेन्नईकडून 272 सामने खेळले आहेत. यामध्ये 238 डावांत फलंदाजी करताना तो 99 वेळा नाबाद राहिला आहे. त्याने एकूण 5 हजार 314 रन्स केले असून त्याच्या नावावर 23 अर्धशतकांची नोंद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP च्या मनात नेमकं शिजतंय तरी काय? पक्षबांधणीनंतर आता ‘Cockroach Club’ पोस्टरची चर्चा

Maharashtra News Live Update: विधानपरिषद निवडणुकीनंतर भाजपचे उच्चस्तरीय विचारमंथन; निवडणुकीतील कामगिरीचे आत्मचिंतन सुरू

Winter Health : आला हिवाळा, दररोज ही फळं खा! राहाल फिट अँड फाईन आणि त्वचाही पाऱ्यासारखी चमकू लागेल

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हा मॉर्फिंग फोटो प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीला अटक झाली, पण...

Ayushman Bharat Card : तुमच्याकडे आहे का आयुष्मान कार्ड? वर्षाला ₹5 लाखांपर्यंत मोफत उपचार, असा करा ऑनलाइन अर्ज

SCROLL FOR NEXT