rcb vs dc twitter
Sports

RCB VS DC Match Result: दिल्लीला पराभवाचा 'पंच', नवख्या विजयकुमार विशकने DC च्या फलंदाजांना लोळवलं

RCB VS DC Match Highlights: आयपीएल २०२३ स्पर्धेतील २० वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स संघांमध्ये पार पडला

Ankush Dhavre

IPL 2023 : आयपीएल २०२३ स्पर्धेतील २० वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स संघांमध्ये पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील फलंदाज आणि गोलंदाजांनी जोरदार कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्स संघावर २३ धावांनी विजय मिळवला आहे. हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा या हंगामातील दुसरा विजय आहे. तर दिल्लीचा सलग पाचवा पराभव आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने केल्या १७४ धावा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ गडी बाद १७४ धावा केल्या आहेत. या सामन्यात माजी कर्णधार विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली. विराटने सलामीला फलंदाजीला येऊन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला चांगली सुरुवात करून दिली.

त्याने ३४ चेंडूंचा सामना करत ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५० धावांची खेळी केली आहे. तर महिपाल लोमरोरने २६ आणि ग्लेन मॅक्सवेलने २४ धावांचे योगदान दिले. शेवटी अनुज रावत आणि शाहबाज अहमदने महत्वपूर्ण खेळी केली.

दिल्लीचे फलंदाज ठरले फ्लॉप..

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला विजय मिळवण्यासाठी १७५ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना मनीष पांडेला वगळता दिल्लीच्या इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

मनीष पांडेने या डावात ५० धावांची खेळी केली. तर अक्षर पटेलने २१ आणि कर्णधार अक्षर पटेल १९ धावा करत माघारी परतला. (Latest sports updates)

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू :

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज, विजयकुमार विशाक

दिल्ली कॅपिटल्स:

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मिचेल मार्श, यश धुल, मनीष पांडे, अक्षर पटेल, अमन हकीम खान, ललित यादव, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, मुस्तफिझूर रहमान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर; बड्या नेत्याच्या निधनाने राजकारणात हळहळ

Gokul Election Result: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीला झटका, सतेज पाटील यांच्या एकाकी झुंजेला यश, वाचा विजयाची इनसाईड स्टोरी

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर

Heart Blockage: लिंबू-आल्याचं पाणी प्यायल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील चरबी कमी होते? डॉक्टरांनी सांगितलं सर्जरीशिवाय कसे ठीक कराल ब्लॉकेज?

Sleeping : गाढ अन् शांत झोप लागत नाही?आजपासूनच टाळा रात्रीच्या 'या' ५ सवयी

SCROLL FOR NEXT