RAVINDRA JADEJA Saam Tv
Sports

Ravindra Jadeja: टीम इंडियाचा सुपरमॅन! जडेजाने हवेत झेपावत घेतला लाबूशेनचा भन्नाट एकहाती झेल

Ravindra jadeja catch video: पहिल्याच सामन्यात रवींद्र जडेजाने आपल्या अप्रतिम फिल्डिंगने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.

Ankush Dhavre

Ind vs Aus 1st ODI: काही दिवसांपूर्वीच भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली.

या मालिकेत भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने अप्रतिम कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले होते. आता या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेला प्रारंभ झाला आहे.

दरम्यान पहिल्याच सामन्यात रवींद्र जडेजाने आपल्या अप्रतिम फिल्डिंगने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.

रवींद्र जडेजा हा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. तो गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये मोलाचे योगदान देत असतो.

मात्र जेव्हा फिल्डिंग करण्यासाठी येतो, त्यावेळी देखील जोरदार कामगिरी करत असतो. नुकताच त्याने झेल टिपला आहे ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

तर झाले असे की, ऑस्ट्रेलिया संघाची फलंदाजी सुरु असताना २३ वे षटक टाकण्यासाठी कुलदीप यादव गोलंदाजीला आला होता.

या षटकातील चौथ्या चेंडूवर मार्नस लाबुशेनने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला कारण चेंडू बॅटचा कडा घेत पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण करत असलेल्या रवींद्र जडेजाच्या हातात गेला. हा चेंडू त्याच्यापासून लांब होता, मात्र त्याने डाइव्ह मारत अप्रतिम झेल टिपला. (Latest sports updates)

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११ :

ऑस्ट्रेलिया संघ -

ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श,स्टिव्ह स्मिथ (कर्णधार),मार्नस लॅबुशेन,जोश इंग्लिस,ग्लेन मॅक्सवेल,कॅमरन ग्रीन, मार्कस स्टॉयनिस, शॉन एबॉट, मिशेल स्टार्क,अॅडम झम्पा

भारतीय संघ-

शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव , मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: भररस्त्यात भाजप कार्यकर्त्याची हत्या, ९ गोळ्या झाडत जागीच संपवलं; पुणे हादरले

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे ₹१५०० बंद होणार, ई-केवायसीबाबत सरकारने दिली महत्वाची अपडेट

राज्यातील ५९ RTOऑफिसची १ मेपासून विशेष तपासणी मोहीम; नियम मोडणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर होणार कडक कारवाई

आपच्या खासदारानंतर आता 'या' राज्यातील अख्खा पक्षच भाजपमध्ये विलीन होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Weight Loss Foods: डाएटमध्येही खाऊ शकता हे ७ स्ट्रीट फूड, वजनावर काहीच होणार नाही परिणाम

SCROLL FOR NEXT