Rahmanullah Gurbaz Six Twitter
Sports

Rahmanullah Gurbaz Six: बंदे मे दम है..! IPL च्या दुसऱ्याच चेंडूवर पट्ठ्याने मारला १०१ मीटरचा षटकार - VIDEO

Rahmanullah Gurbaz Six Video: दरम्यान पहिल्याच सामन्यात त्याने खणखणीत षटकार ठोकला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

PBKS VS KKR LIVE MATCH UPDATES: आयपीएल २०२३ स्पर्धेतील दूसरा सामना पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे.

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून रहमानउल्ला गुरबाजला पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.

दरम्यान पहिल्याच सामन्यात त्याने खणखणीत षटकार ठोकला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

कर्णधार नितीश राणाने पहिल्याच सामन्यात रहमानउल्ला गुरबाजवर विश्वास दाखवला आणि त्याला फलंदाजी करण्याची संधी दिली.

त्याला या डावात मोठी खेळी करता नाही आली . मात्र छोटी इनिंग करत त्याने सर्वांना दाखवून दिलं आहे की, मी देखील मोठे फटके खेळू शकतो.

रहमानउल्ला गुरबाज कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून सलामीला फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याने सॅम करनच्या षटकातील पाचव्या चेंडूवर खणखणीत षटकार मारला. हा षटकार १०१ मीटरचा होता.

त्यामुळे आपण आता म्हणू शकतो की, कोलकाता नाईट रायडर्स संघात आता आंद्रे रसलनंतर आणखी एका विस्फोटक फलंदाजाची एंट्री झाली आहे. (Cricket Latest updates)

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

कोलकाता नाईट रायडर्स

रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), मनदीप सिंग, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, सुनील नारायण, टीम साऊदी, अनुकूल रॉय, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती

पंजाब किंग्स :

शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, शाहरुख खान, सॅम करन, सिकंदर रझा, नेथन एलिस, हरप्रीत ब्रार, राहुल चाहर, अर्शदीप सिंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवी मुंबईत अपघाताचा थरार! धावत्या ट्रेनखाली महिलेने झोकून दिलं; शरीराचे झाले 2 तुकडे

Acid Attack On Minor Girl: सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगरमधील संतापजनक घटना

Maharashtra Live News Update: सीसीटीव्हीचा 100% निकाल देणाऱ्या परीक्षा केंद्रांना मोठा दणका

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध नाही; सुनेत्रा पवारांच्या विरोधात बडा नेता रिंगणात उतरणार

Kairichi Kadhi Recipe : उन्हाळ्यात करा कोकणी मेजवानी; गरमागरम भात अन् कैरीची आंबट-गोड कढी, जणू स्वर्ग सुखच

SCROLL FOR NEXT