r ashwin  twitter
Sports

Ind vs Aus 4th test: टीम इंडियाला तंगवणाऱ्या ग्रीनचा आर अश्विनने असा काढला काटा -VIDEO

आर अश्विनने कॅमरुन ग्रीनला बाद करत माघारी धाडले आहे.

Ankush Dhavre

R ashwin: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील अंतिम कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत जोरदार कामगिरी केली आहे. दरम्यान आर अश्विनने कॅमरुन ग्रीनला बाद करत माघारी धाडले आहे. (Latest sports updates)

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय योग्य ठरवत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलिया संघाला चांगली सुरुवात करून दिली.

पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ४ गडी बाद २५५ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या दिवशीही ऑस्ट्रेलियन फलंदाज टिचून फलंदाजी करत होते.

रोहित शर्माने १३१ वे षटक टाकण्याची जबाबदारी आर अश्विनला दिली होती. त्याने या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर कॅमरुन ग्रीनला माघारी धाडले. अश्विनने टाकलेल्या चेंडूवर कॅमरुन ग्रीनने स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्याचा हा प्रयत्न फसला कारण चेंडू बॅटचा कडा घेत यष्टीरक्षक केएस भरतच्या हातात. यावेळी त्याने कुठलीही चूक न करता अप्रतिम झेल टिपला. कॅमरुन ग्रीन ११४ धावांची खेळी करत माघारी परतला. तर याच षटकात त्याने ऍलेक्स कॅरीला देखील बाद करत माघारी धाडले.

उस्मान ख्वाजा आणि कॅमरुन ग्रीन यांनी अप्रतिम खेळी केली. दोघांनी मिळून भारतीय गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. दोघांनी मिळून २०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलिया संघाला मजबूत स्थितीत पोहचवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi For Mental Health : अशाप्रकारे करा तुळशीचा वापर, मानसिक तणावापासून सुटका मिळवा

Horoscope : 10 ते 15 ऑगस्टपर्यंत बारा राशींचे संपूर्ण राशी, वाचा फक्त एका क्लिकवर

Buldhana Heavy Rain : बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस; शेताला आले तलावाचे स्वरूप, घरातही शिरले पाणी

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Box Office: शनिवारी 'महावतार नरसिंह'ने मारली बाजी; 'सैयारा', 'सन ऑफ सरदार २'ने केली कमाई

SCROLL FOR NEXT