Punjab Kings vs Gujarat Titans Match Saam tv
Sports

Punjab Kings vs Gujarat Titans Match: पांड्या परतला अन् गोलंदाजीला धार आली! गुजरातने पंजाबला १५३ धावांत रोखलं

पांड्याच्या निर्णयामुळे पंजाबचा संघ प्रथम फलंदाजी करण्यास उतरला. पंजाबने गुजरातला 154 धावांचे आव्हान दिलं आहे

Vishal Gangurde

PBKS VS GT Match News: पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्सच्या दरम्यान आज मोहालीत १८ वा सामना होत आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेकीचा जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पांड्याच्या निर्णयामुळे पंजाबचा संघ प्रथम फलंदाजी करण्यास उतरला. पंजाबने गुजरातला 154 धावांचे आव्हान दिलं आहे. (Latest Marathi News)

पंजाब संघाची फलंदाजीची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. गुजरातच्या मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात पंजाबला धक्का दिला.पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूत प्रभसिमरला माघारी परतवलं. त्यानंतर चौथ्या षटकात पंजाबचा कर्णधार शिखर धवनला बाद केले. पंजाबला शिखरच्या रुपात दुसरा धक्का बसला. पंजाबने पॉवर प्लेच्या आतच दोन गडी गमावले.

जलद गतीने खेळणाऱ्या मॅथ्यू शॉर्टला देखील रशिद खानने बाद केले. शॉर्ट हा २४ चेंडूत ३६ धावा करत बाद झाला. शॉर्टने ६ चौकार आणि १ षटकार लगावला. पंजबाला चौथा धक्का जितेश शर्माच्या रुपाने बसला. जितेशने २३ चेंडूत २५ धावा कुटल्या. त्यानंतर भानुका राजपक्षे २६ चेंडूत २० करत तंबूत परतला.

भानुका राजपक्षे स्वस्तात माघारी परतल्यानंतर सॅम करन देखील बाद झाला. सॅमने २२ चेंडूत २२ धावा कुटल्या. त्याने खेळताना एक चौकार आणि एक षटकार लगावला. त्यानंतर शाहरुख आणि हरप्रित देखील स्वस्तात माघारी परतले. पंजाबच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या संघाने २० षटकात १५३ धावा कुटल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापुरात अवकाळीसोबत गारांचा वर्षाव

"माझ्याकडे अभिनेत्री म्हणून पाहत नाहीत...", बॉलिवूडची प्रसिद्ध Actress असं का म्हणाली?

LIC Recruitment: खुशखबर! LIC मध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Papad Rassa Bhaji :गावरान स्टाईल पापडाची रस्सा भाजी कशी बनवायची? मिनिटांतच होईल फस्त

Riteish Deshmukh Son Debut: रितेश देशमुखच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 'राजा शिवाजी' चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका

SCROLL FOR NEXT