pkl season 10 saam tv news
Sports

PKL Season 10: यु मुंबाला हरवून गुजरात जायंट्सची चौथ्या स्थानी झेप

U Mumba vs Gujarat Giants: दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत गुजरात जायंटस संघाने यु मुंबा संघाचा 44-35 असा पराभव करून गुण तक्त्यात चौथ्या स्थानी झेप घेतली.

Ankush Dhavre

Pro Kabaddi News In Marathi:

दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत गुजरात जायंटस संघाने यु मुंबा संघाचा 44-35 असा पराभव करून गुण तक्त्यात चौथ्या स्थानी झेप घेतली. प्रतीक दहीयाने अष्टपैलू खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर, यु मुंबाकडून गुमान सिंगने (11गुण) सुरेख कामगिरी केली.

पाटलीपुत्र इंडोर स्टेडियम येथे झालेल्या या लढतीत यु मुंबा आणि गुजरात जायंटस दोन्ही संघांनी जोरदार आक्रमण केले. यु मुंबाच्या गुमान सिंगने संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण गुजरातने बरोबरी साधली. 11व्या मिनिटाला हैदरअली एकरामीने गुजरातच्या फजल अत्राचली याला बाद करुन संघाला तीन गुणांची आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर पूर्वार्ध संपण्यास एकच मिनिट शिल्लक असताना गुजरातने मुंबा संघावर पहिला लोन चढवून 20-17 अशी आघाडी मिळवली.

उत्तरार्धात गुजरात संघाने आपली आघाडी कायम ठेवत 25-22 अशी राखली. 30व्या मिनिटाला आघाडीवर असलेल्या गुजरातने मुंबा संघावर दुसरा लोन चढविला 33-27अशी आघाडी वाढवली. (Kabaddi News In Marathi)

सामना संपण्यास 10मिनिटे शिल्लक असताना पिछाडीवर असलेल्या मुंबा संघाला कमबॅक करण्याची संधी दिली नाही. गुजरातच्या प्रतीक दहियाने आपला सुपर 10 पुर्ण करत संघाची आघाडी अधिक भक्कम केली. यु मुंबा संघाने सामना बरोबरीत सोडवण्यासाठी अखेरपर्यंत झुंज दिली. परंतु गुजरातने आपले वर्चस्व कायम राखत राकेश ने शेवटच्या रेडवर संघाला गुण मिळवून दिला व गुजरात संघाने मुंबा संघावर 44-35 असा विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर बंदी, ग्राहकांची कृत्रिम पनीरपासून सुटका

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, आयएमडीचा इशारा

शिक्षक बदली घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई; 33 शिक्षक निलंबित, 65 जणांची वेतनवाढ थांबवली

MPSC परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

धक्कादायक! खड्ड्यांमुळे रिक्षातच प्रसूती; भिवंडीत प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड

SCROLL FOR NEXT