prithvi shaw viral video twitter
Sports

Prithvi Shaw Bowling: पृथ्वी शॉ बनला शेन वॉर्न! बॉल ऑफ द सेंच्युरी पेक्षा जास्त फिरवला चेंडू; VIDEO पाहायलाच हवा

Prithvi Shaw Bowling Video: नुकताच त्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे

Ankush Dhavre

VIRAL VIDEO: आयपीएल २०२३ स्पर्धेत पृथ्वी शॉ संघर्ष करताना दिसून आला होता. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून डावाची सुरुवात करताना त्याला एकदाही चांगली सुरुवात करून देता आली नव्हती. आयपीएल स्पर्धेचा शेवट झाला असला तरी देखील तो काही ना काही कारणामुळेच चर्चेत येत असतो.

आतापर्यंत तुम्ही पृथ्वी शॉला फलंदाजी करताना गोलंदाजांची धुलाई करताना पाहिलं असेल. मात्र स्वतः गोलंदाजी करून गुगली चेंडू टाकताना पाहिलं आहे का? नुकताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. ज्यात तो शेन वॉर्न स्टाईल गोलंदाजी करताना दिसून येत आहे.

पृथ्वी शॉ आक्रमक फलंदाजासह पार्ट टाइम गोलंदाजी करण्यासाठी देखील ओळखला जातो. नुकताच त्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात तो आपल्या फिरकी गोलंदाजीच्या बळावर फलंदाजाला नाचवताना दिसून येत आहे.

हा व्हिडिओ २ वर्षांपूर्वीचा आहे. मात्र तो आता जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना ऑस्ट्रेलिया ए संघाविरुद्ध खेळताना गोलंदाजी करताना असा काही चेंडू टाकला होता, तो भले भले दिग्गज टाकू शकत नाही.

लेग स्पिन गोलंदाजी करत फलंदाजाला केलं कन्फ्युज..

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पृथ्वी शॉ ऑस्ट्रेलिया ए संघाविरुद्ध गोलंदाजी करताना दिसतोय. या षटकातील पाचवा चेंडू तो असा काही टाकतो, ज्यावर फलंदाजासह यष्टिरक्षक देखील कन्फ्युज होऊन जातो.

मैदानावर सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक देखील आश्चर्यचकीत होऊन जातात. चेंडू फलंदाज आणि यष्टिरक्षकाला चकावुन थेट सीमारेषेच्या दिशेने जातो. (Latest sports updates)

गोलंदाजीसह त्याने फलंदाजीत देखील मोलाचं योगदान दिलं होतं. या सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजी करताना पृथ्वी शॉने ६२ धावांची खेळी केली होती.

तो अप्रतिम फलंदाजी करून मोठी खेळी करणार असे वाटत असताना ६२ धावांवर त्याला मैदान सोडावं लागलं होतं. आता त्याच्या गोलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

HSRP Number Plate Update: ... तर तुम्हाला भरावा लागणार ₹१००० चा दंड, HSRP नंबर प्लेटवर मोठी अपडेट

एक रुपया खर्च न करता किडनी आणि लिव्हर होईल स्वच्छ; सकाळी रिकाम्यापोटी प्या 'हे' ड्रिंक

Feeling Cold All The Time: तुम्हाला सतत थंडी वाजते? ही आहेत ६ कारणं

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

SCROLL FOR NEXT