प्रिन्स यादवने टीम इंडियाकडून पदार्पण केले.
आयपीएल 2026 मधील उत्कृष्ट कामगिरी
टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन महत्त्वाचे बदल केले.
अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडियाने प्लेइन इलेव्हनमध्ये तीन बदल केले. या बदलांपैकी सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे प्रिन्स यादवचा संघात समावेश. प्रिन्स यादव देशासाठी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. आयपीएल २०२६ मधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. (From IPL Hero To Team India Debutant: The Untold Story Of Prince Yadav)
आयपीएलचे केवळ दोन हंगाम खेळलेला आणि देशांतर्गत क्रिकेटचा मर्यादित अनुभव असलेला प्रिन्स यादवनं अत्यंत कमी कालावधीत प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. या यशामागील कारण आहे त्याने टाकलेला एक विशिष्ट चेंडू. हो, त्याच चेंडूमुळे त्याच्या आयुष्याने मोठी कलाटणी घेतली आहे.
प्रिन्स यादवच्या पदार्पणामागील एक मुख्य कारण म्हणजे त्याच्या गोलंदाजांमधील विशेष गुणधर्म. प्रिन्स यादव अतिशय वेगाने गोलंदाजी करू शकतो. यासह त्याच्याकडे 'इन-स्विंगर' व 'आउट-स्विंगर' असे दोन्ही प्रकारचे चेंडू टाकण्याचे कौशल्य आहे.
यासह तो नवीन चेंडू आणि डेथ ओव्हर्समध्ये ही छान गोलंदाजी करू शकतो. आयपीएलमध्ये २०२६ मध्ये याची चुणूक त्याने दाखवली सुद्धा होती. आयपीएलदरम्यानच त्याने असा एक चेंडू टाकला, ज्यामुळे त्याच्या कारकिर्दीची दिशा आणि वाटचाल बदलून टाकली.
लखनौच्या अटल बिहारी स्टेडियमवर होत असलेल्या सामन्यात प्रिन्स यादवला पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याच स्टेडियमवर त्याने विराट कोहलीला शुन्यावर बाद केलं होतं. तेही असं तसं नाही थेट विराटचा त्रिफळा उडवला होता. जगात आपल्या फलंदाजीचा डंका गाजवणाऱ्या विराट कोहलीला त्या चेंडूला नीट खेळता आलं नव्हतं.
प्रिन्स यादवने ताशी १४० किमी वेगाने टाकलेला 'इन-स्विंगर' चेंडू विराटची बॅट आणि पॅड्स यांच्या मधून निसटसा आणि थेट स्टंप्सवर आदळला. आपण चेंडू खेळण्यापासून चुकलो आहोत यावर विराटला विश्वासच बसत नव्हता. विशेष म्हणजे, सामन्यापूर्वी एका वाहिनीवर विराटनेच त्याला सातत्यपूर्ण गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला होता. त्याच गोलंदाजाने विराटची विकेट घेतली.
प्रिन्स यादवने आयपीएल २०२६ मध्ये १९ बळी घेत प्रभावी कामगिरी केली होती. त्याने ८.८ धावा प्रति षटक असा 'इकॉनॉमी रेट' राखला होता. त्याची सर्वोत्तम कामगिरी ३२ धावांत ३ बळी अशी होती. प्रिन्स यादवच्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दी पाहिली तर, त्याने दोन प्रथम श्रेणी सामन्यांत एक बळी घेतला आहे. 'लिस्ट ए' क्रिकेटमध्ये त्याने १४ सामन्यांत २९ बळी घेतले आहेत. तर टी-२० प्रकारात ३५ सामन्यांत ३८ बळी घेतले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.