Sakshi Dhoni Saam TV
Sports

Sakshi Dhoni: झारखंडमध्ये वीज संकट, साक्षी धोनीने सरकारला घेरले, म्हणाली...

सोशल मीडियावर ट्विट करत तिने झारखंड सरकारला प्रश्न विचारला आहे.

Pravin

झारखंडमध्ये सुरू असलेल्या वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनीने (MS Dhoni Wife Sakshi) प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर ट्विट करत तिने झारखंड सरकारला प्रश्न विचारला आहे. एक करदाता म्हणून झारखंडमध्ये इतक्या वर्षांपासून वीज संकट का आहे? हे जाणून घ्यायचे आहे. आम्ही जाणीवपूर्वक उर्जेची बचत करतो असे साक्षी (Sakshi Dhoni) आपल्या ट्वीटमध्ये म्हणाली आहे. एमएस धोनीप्रमाणेच साक्षीही सोशल मीडियावर कमी सक्रिय असते.

झारखंडमध्ये वीज संकटामुळे लोक अस्वस्थ झाले आहेत. यावर आता साक्षी धोनीने प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, झारखंडचे करदाते म्हणून फक्त हे जाणून घ्यायचे आहे की येथे इतकी वर्षे वीज संकट का आहे?. झारखंडसह देशात महाराष्ट्र, गोवा, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, आंद्र प्रदेश या राज्यांवर वीज संकट आहे.

साक्षी धोनीचे शेवटचे ट्विट हे वर्षभरापूर्वीचे होते. सततच्या लोडशेडिंगमुळे राज्यातील जनता हैराण झाली आहे. राज्यातील बहुतांश भागात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. पश्चिम सिंगभूम, कोडरमा आणि गिरिडीह जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेने वेढले आहे. 28 एप्रिलपर्यंत रांची, बोकारो, पूर्व सिंगभूम, गढवा, पलामू आणि चतरा येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

5 ते 7 तास वीजपुरवठा खंडित

झारखंडच्या शहरांमध्ये सरासरी 5 तासांपेक्षा जास्त आणि ग्रामीण भागात 7 तासांपेक्षा जास्त वीज खंडित होते. त्यामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. लोकांना उन्हाळ्यात विजेविना जगावे लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT