टी- 20 क्रिकेट सामन्यावर सुरू असलेल्या सट्ट्यावर पोलिसांचा छापा Saam TV
Sports

टी- 20 क्रिकेट सामन्यावर सुरू असलेल्या सट्ट्यावर पोलिसांचा छापा

याप्रकरणी आरोपींविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4, 5, अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक करण्यात आलेली आहे.

जयेश गावंडे

अकोल्यात टी- 20 क्रिकेट विश्वकपमधील श्रीलंका व बांग्लादेश यांच्यातील चालणाऱ्या सामन्यावर सुरू असलेल्या सट्ट्यावर पोलिसांनी छापा टाकून मुद्देमालासह आरोपींना अटक केली आहे. अकोल्यातील सातव चौकातील नवजीवन अपार्टमेंटमध्ये हा सट्टा बाजार सुरू होता. गोपनीय माहितीवरून पोलिसांनी या अपार्टमेंट वर छापा टाकला. दरम्यान आरोपी राकेश ओम प्रकाश बाजोरिया राहणार जसनागरा बेकरी जवळ, करण राजेश पड़घन क्रीड़ा संकुल मागे, हे केबल टीव्ही वर चालू असलेल्या टी-20 क्रिकेट मधील श्रीलंका व बांग्लादेश सामन्यावर पैसे लावून जुगार खेळताना मिळून आल्याने त्यांच्याजवळून नगदी 30,100 रुपयासह 25 महागडे मोबाईल, टीव्ही यांसह लाखो रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.

याप्रकरणी आरोपींविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4, 5, अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. राकेश ओमप्रकाश बाजोरीया हा विदर्भातील सर्वात मोठा बुकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अकोल्यात पोलिसांनी कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT