lsg vs pbks twitter
Sports

PBKS VS LSG Match Result: रझा ठरला पंजाबच्या विजयाचा सिकंदर! LSG ला २ विकेट्सने धूळ चारत मिळवला दणदणीत विजय

PBKS VS LSG Highlights: आयपीएल २०२३ स्पर्धेतील २१ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

Ankush Dhavre

IPL 2023 LSG VS PBKS Match Highlights: आयपीएल २०२३ स्पर्धेतील २१ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने जोरदार कामगिरी करत २ गडी राखून विजय मिळवला आहे. हा पंजाबचा या हंगामातील तिसरा विजय आहे.

या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक ७४ धावांची खेळी केली.

या खेळी दरम्यान त्याने ८ चौकार आणि १ षटकार मारला. तर काईल मेयर्सने २९ धावांची खेळी केली. तसेच कृणाल पंड्याने १८ आणि मार्कस स्टोइनिसने १५ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्स संघाने ८ गडी बाद १५९ धावा केल्या होत्या.

पंजाबचा शानदार विजय..

लखनऊ सुपर जायंट्स संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाकडून सिकंदर रजाने ५७ धावांची खेळी केली. तर शॉर्टने ३४ धावांची खेळी केली आणि पंजाब किंग्ज संघाला २ गडी राखून विजय मिळवून दिला. (Latest sports updates)

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

लखनऊ सुपर जायंट्स :

केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पांड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, आवेश खान, युधवीर सिंग चरक, मार्क वुड, रवी बिश्नोई

पंजाब किंग्ज:

अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, सिकंदर रझा, सॅम करन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

सासरच्या छळाला कंटाळली! महिला पोलीस कॉन्स्टेबलनं आयुष्य संपवलं; VIDEOतून केला खुलासा

Maharashtra Rain Live News: तब्बल आठ तासानंतर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला

Crop Insurance : मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांची पिक विम्याकडे पाठ; वर्धा जिल्ह्यातील केवळ ५९ हजार शेतकऱ्यांनी उतरविला विमा

Mumbai News: मुंबईत पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळला, भीतीपोटी पोलीस अधिकाऱ्यानं सरकारी घर सोडलं

SCROLL FOR NEXT