Pat cummins Saam Tv
Sports

IND VS AUS: अंतिम कसोटीतूनही पॅट कमिन्स बाहेर! वनडे मालिकेसाठी संघात मोठा बदल

मालिकेतील निर्णायक सामना अहमदाबादच्या मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघासाठी मोठी बातमी समोर आली आहे

Ankush Dhavre

IND VS AUS Pat Cummins: इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलिया संघाने जोरदार कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ९ गडी राखून विजय मिळवला होता. यासह या मालिकेत ऑस्ट्रलियाने २-१ ने कमबॅक केले आहे.

तर मालिकेतील निर्णायक सामना अहमदाबादच्या मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघासाठी मोठी बातमी समोर आली आहे. (Latest sports updates)

ऑस्ट्रेलिया संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स हा दुसरा कसोटी सामना झाल्यानंतर वैयक्तिक कारणास्तव मायदेशी परतला होता. याच कारणास्तव तो तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळताना दिसून आला नव्हता.

तसेच आगामी चौथ्या कसोटी सामन्यासाठी देखील तो उपलब्ध नसणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार तो अंतिम कसोटी सामन्यासाठी देखील उपलब्ध नसेल, त्यामुळे पुन्हा एकदा स्टीव्ह स्मिथ संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे.

दुसरा कसोटी सामना झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू माघारी परतले होते. त्यामध्ये पॅट कमिन्सचाही समावेश होता. असे म्हटले जाते होते की,तो तिसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करू शकतो. मात्र तो अद्यापही परतलेला नाहीये. त्यामुळे असा अंदाज वर्तवला जात आहे की, तो भारतीय संघाविरुध्द होणाऱ्या वनडे मालिकेतूनही बाहेर होऊ शकतो.

दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा सामना..

हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकून भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाण्याची संधी असणार आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाला ही मालिका बरोबरीत आणण्याची संधी असणार आहे.

ऑस्ट्रेलिया संघाने तिसरा कसोटी सामना जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ऑक्टोबरमध्ये उन्हाचा कहर! मुंबईसह ६ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा; हवामान विभागाकडून २ दिवसासाठी अलर्ट

क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरीत आले अन् अनर्थ घडला! कल्याणच्या दोन मुलांचा डोहात बुडून मृत्यू

Urinary Problem: थांबून-थांबून लघवी होत असेल तर दुर्लक्ष करू नका, गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण

आईने भावाच्या नावावर शेती केली; मुलाची सटकली, घरात असं काही थरारक घडलं की अख्खं गाव हादरलं

SCROLL FOR NEXT