Cameron green Twitter
Sports

Ind vs Aus 4th Test: …म्हणून ऑस्ट्रेलियाचे फलंदाज हाताला काळी पट्टी बांधून उतरले मैदानात

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आपल्या दंडावर काळ्या रंगाची पट्टी घालून मैदानात उतरले आहेत.

Ankush Dhavre

Pat cummins mother paased away: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजानी जोरदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले होते.

आज या सामन्याचा दुसरा दिवस सुरु आहे. मात्र दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यापूर्वीच एक वाईट बातमी समोर आली आहे. (Latest sports updates)

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हा दुसरा कसोटी सामना झाल्यानंतर माघारी परतला होता. आता एक वाईट बातमी समोर आली आहे. पॅट कमिन्सच्या आईचे निधन झाले आहे.

काही दिवसांपासून ते आजारी होत्या. मारिया यांना श्रद्धांजली देण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आपल्या दंडावर काळ्या रंगाची पट्टी घालून मैदानात उतरले आहेत.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विट करत याबात माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की,'मारिया कमिन्सच्या निधनाने आम्ही सर्व दु:खी आहोत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वतीने आम्ही कमिन्स आणि त्याच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करतो. ऑस्ट्रेलियाचा संघ काळी पट्टी बांधून मैदानात उतरणार आहे.'

मारिया यांना २००५ मध्ये ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे कळले होते. गेल्या काही आठवड्यापासून त्या आजारी देखील होत्या. बीसीसीआयने देखील ट्विट करत आम्ही पॅट कमिन्सच्या दुःखात सहभागी आहोत असे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: गर्लफ्रेंडसोबत वाजलं, संतापलेल्या बायफ्रेंडनं सपासप १८ वार केले; त्याआधी दुसरीसोबत ठेवले संबंध

Maharashtra Live News Update : निलेश घायवळ विरोधात "ब्लू कॉर्नर" नोटीस

....त्यासाठी इंदिरा गांधींना जीवाची किंमत मोजावी लागली, काँग्रेस नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

Breast cancer vaccine: ही लस ब्रेस्ट कॅन्सर पूर्णपणे संपवू शकते; वाचा शरीरात कसा होतो बदल?

Prostate Cancer Signs: आतड्याला त्रास होतोय, वेळीच तपासणी करा; तज्ज्ञांनी सांगितली प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणं अन् महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT