Parul Chaudhary twitter
Sports

Parul Chaudhary News: 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत पारूलने रचला इतिहास; मोडला नॅशनल रेकॉर्ड

Women 3000 Meter Steeplechase Race: पारूल चौधरीने नॅशनल रेकॉर्ड मोडून काढला आहे.

Ankush Dhavre

Parul Chaudhary News World Athletics Championship Final:

वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा नुकताच संपन्न झाली आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. भारतीय धावपटू पारुल चौधरीने ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम मोडत ११ वे स्थान पटकावले आहे.

या विक्रमी कामगिरीसह तिने २०२४ मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपलं स्थान निश्चित केलं आहे.

पारुलने ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत ११ व्या स्थानी राहिली. तिने हे अंतर ९ मिनिट १५:११ सेकंदात पूर्ण केले. तर ब्रुनेईच्या विन्फ्रेड मुटिले यावीने हे अंतर ८ मिनिट ५४:२९ सेकंदात पूर्ण केले. यासह सुवर्ण पदकाला गवसणी घातली.

तर केनियाच्या बीट्राइस चेपकोचने हे अंतर ८ मिनिट ५८:९८ सेकंदात हे अंतर पूर्ण केलं. यासह तिने रौप्य पदक पटकावले.

पारुल चौधरीबद्दल बोलायचं झालं तर, तिने ३००० मीटर स्टीपलचेसच्या सुरुवातीच्या २०० मीटरमध्ये आघाडी घेत, नंबर १ स्थान गाठलं होतं. मात्र शर्यत जसजशी पुढे गेली तशी तिची धावण्याची गती कमी झाली.

तर धावपटू तिच्या पुढे निघाले. त्यानंतर तिला कमबॅक करता आलं नाही. या स्पर्धेत तिला ११ व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. मुख्य बाब म्हणजे २९०० मीटरपर्यंत ती १३ व्या स्थानी होती. मात्र शेवटच्या १०० मीटरमध्ये तिने गती वाढवली आणि ११ व्या स्थानी शर्यत संपवली. (Latest sports updates)

नीरजची सुवर्ण कामगिरी..

वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पुन्हा एकदा चमकला आहे. त्याने स्पर्धेतील अंतिम सामन्यात ८८.१७ मीटर लांब भाला फेकून सुवर्णपदक पटकाववलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT