lakshya sen hs prannoy twitter
Sports

Paris Olympics 2024: एकाच वेळी भारताचा विजय अन् पराभव! लक्ष्य सेनची पदकाच्या दिशेने वाटचाल

Lakshya Sen vs HS Prannoy: बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने आपलाच सहकारी खेळाडू एचएस प्रणॉयचा सरळ सेटमध्ये पराभव केला आहे.

Ankush Dhavre

बॅडमिंटनपटूंनी पदक मिळवून देण्याच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. पुरुषांच्या राऊंड ऑफ १६ बॅडमिंटन सामन्यात लक्ष्य सेन आणि एचएस प्रणोय हे दोन्ही भारतीय खेळाडू आमनेसामने होते. या सामन्यात लक्ष्य सेनने एचएस प्रणॉयवर २१-१२ आणि २१-०६ ने विजय मिळवला आहे. यासह पॅरिस ऑलिंपिक २०२४ स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

लक्ष्य सेन आणि प्रणॉय यांच्यात उपउपांत्य फेरीचा सामना रंगला. या सामन्यात सुरुवातीपासूनच लक्ष्य सेन प्रणॉयवर भारी पडल्याचे पाहायला मिळाले. त्याने प्रणॉयला कमबॅक करण्याची संधीत दिली नाही. लक्ष्यने प्रणॉयचा पहिल्या सेटमध्ये २१-१२ ने पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये त्याने प्रणॉयला कमबॅक करण्याची संधीच दिली नाही. दुसऱ्या सेटमध्ये लक्ष्यने २१-०६ ने बाजी मारली आणि उपांत्यफेरीत प्रवेश केला.

दुहेरीत भारताचा पराभव

बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीत भारत आणि मलेशियाची जोडी आमनेसामने होती. भारताकडून सात्विकसाईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी आणि मलेशियाच्या चिआ आरोन व सोह वूई यिक यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये भारतीय जोडीने बाजी मारली. भारतीय जोडीने हा सेट २१-१३ ने जिंकला. त्यानंतर दोन्ही सेटमध्ये मलेशियाच्या जोडीने कमबॅक केलं आणि भारतीय जोडीवर १३-२१, २१-१४ आणि २१-१६ ने विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: पैठणीत खुललं वैदेही परशुरामीचं सौंदर्य; सोज्वळ सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

Live Update : निवडणूक चिन्ह कुणाचे? सर्वोच्च न्यायालयात सिब्बल, सरन्यायाधीश अन् जज बागची यांच्यात जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT