viral videoc twitter
Sports

Viral Cricket Video: बंगळुरूत Live सामन्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, पुढे जे घडलं..पाहा Video

AUS vs PAK, Viral Video: या सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Pak Fans and Police: 

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील १८ व्या सामन्यात पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यादरम्यान नवा वाद पेटल्याचे पाहायला मिळाले आहे. हा सामना पाहण्यासाठी पाकिस्तानी फॅन्सने देखील मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती.

दरम्यान सामना सुरू असताना पाकिस्तानी फॅन्स पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत होते, त्यावेळी पोलिस अधिकाऱ्याने त्याला पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यापासून थांबवलं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तु्म्ही पाहू शकता की, पाकिस्तानला चियर करण्यासाठी आलेला फॅन पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देताना दिसून येत आहे.

त्यावेळी पोलिस अधिकारी त्याला या घोषणा देण्यापासून देताना दिसून येत आहे. पोलिस अधिकाऱ्याने थांबवल्यानंतर तो फॅन पोलिस अधिकाऱ्याला प्रश्न विचारण्यात देताना दिसून येत आहे.

तो म्हणतोय की, 'स्टेडियममध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचा सामना सुरु आहे. तरी लोकं भारत माता की जय अशा घोषणा देत आहेत. मग आम्ही पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा का देऊ नये..' यावर पोलिस अधिकाऱ्याने उत्तर देत त्याला म्हटले की, भारत माता की जयच्या घोषणा चालतील पण पाकिस्तान जिंदाबाद चालणार नाही.'

सोशल मीडियावर पेटला वाद...

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी प्रतिक्रीया देताना दिसून येत आहेत. काही युजर्सचं असं म्हणंण पाकिस्तानी क्रिकेट फॅन्सला भारतात येऊन आपल्या संघाला चियर करताना अडचणी येताय. तर काही भारतीय क्रिकेट फॅन्सचं असं म्हणणं आहे की, पोलिस अधिकाऱ्याने जे केलं ते योग्य आहे. (Latest sports updates)

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ३६७ धावांचा डोंगर उभारला.

ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक १६३ धावांची खेळी केली. तर मिचेल मार्शने १२१ धावांचा डोंगर उभारला. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी ३६८ धावांची गरज होती. मात्र पाकिस्तानचा संपूर्ण डाव अवघ्या ३०५ धावांवर संपुष्टात आला. पाकिस्तानकडून इमाम उल हकने सर्वाधिक ७० धावांची खेळी केली. तर अब्दु्ल्ला शफिकने ६४ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT