pakistan fan saam tv
Sports

Team India Victory Celebration: भारताच्या विजयाचा पाकिस्तानात जल्लोष! जबरा फॅनने नोटांचा पाऊस पाडला - VIDEO

Team India Victory Celebration In Pakistan: भारतीय संघाच्या विजयाचा पाकिस्तानात जल्लोष करण्यात आला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा जल्लोष साजरा करण्याची संधी दिली. भारतीय संघाने एकही सामना न गमावता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत शानदार विजयाची नोंद केली. भारताने फायनलमध्ये ४ गडी राखून विजय मिळवला. या विजयानंतर केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तानातही विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला आहे.

भारतीय संघाच्या विजयानंतर देशवासीयांनी फटाके फोडून, डान्स करून जल्लोष केला. खेळाडू मैदानात डान्स करताना दिसून आले. तर फॅन्स रस्त्यावर उतरून विजयाचा जल्लोष साजरा करताना दिसून आले. दरम्यान पाकिस्तानातील क्रिकेट फॅन्स रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं कौतुक करून पैशांची उधळण करताना दिसून आले.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात तुम्ही पाहू शकता की, पाकिस्तानचा क्रिकेट फॅन भारतीय खेळाडूंचं कौतुक करताना दिसून येत आहे. या फॅनने रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं तोंडभरून कौतुक केलं. यासह नोटांची उधळणही केली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

भारतीय संघाचा विजय

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. पहिल्या डावात फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटक अखेर २५१ धावा केल्या. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २५२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारताने ४ गडी राखून विजय मिळवला. हा भारताचा या स्पर्धेतील तिसरा विजय ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT