Babar Azam Saam TV
Sports

Babar Azam: खासगी Video आणि फोटो लीक झाल्यानंतर बाबर आझमचे ट्विट चर्चेत, म्हणतोय; 'आनंदी राहण्यासाठी...'

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Gangappa Pujari

Pakistan Cricket: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मायदेशातच वनडे आणि कसोटी मालिकेत हरल्यानंतर बाबर आझमला जोरदार टीकेला सामोरे जावे लागत होते. अशातच सोशल मीडियावर काही पर्सनल व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले, जे बाबर आझमचा असल्याचा दावा केला जात आहे.

हे व्हिडिओ आणि फोटो लीक झाल्यानंतर बाबर आझमचे ट्विट व्हायरल होत आहे. (Pakistan News)

याबाबत अधिक माहिती अशी की, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचे खासगी फोटो आणि व्हिडिओ लीक झाल्याने क्रिडा जगतात खळबळ माजली होती. हे व्हिडिओ आणि फोटो बाबर आझमचे असून संघातीलचं एका क्रिकेटपटूच्या गर्लफ्रेंडशी तो बोलत असल्याचेही सांगण्यात येत होते.

या सगळ्या गोंधळानंतर बाबर आझमने नवीन ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये बाबर आझमने (Babar Azam) त्याचा एक फोटो शेअर केला आहे. ज्याला त्याने "आनंदी व्हायला फार काही करायला नाही," असा सुचक कॅप्शनही दिला आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून त्यावर त्याच्या चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अनेकांनी त्याला कमेंटमध्ये या प्रकरणातून लवकर बाहेर पडशील असा सल्लाही दिला आहे. तर काही जणांनी या व्हायरल व्हिडिओ आणि फोटोंबद्दल त्याच्यावर जोरदार टिका केली आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या कर्णधारावर असे गंभीर आरोप होण्याची ही पहिलीच नाही. याआधीही बाबर आझमवर एका महिलेने शारिरिक शोषणाचा आरोप केला होता. ज्यामध्ये तिने "बाबर आझम आणि मी एकाच शाळेत शिकत होतो. याच काळात त्याने मला प्रपोज केला आणि मी सुद्धा त्याला होकार दिला होता."

"मात्र क्रिकेट संघात निवड झाल्यानंतर त्याचे वागणे पुर्णपणे बदलले आणि त्याने लग्नालाही नकार दिला. या काळात मी गरोदर होते, मात्र घरातून पळून आल्याने घरी जाऊ शकत नव्हते. असे गंभीर आरोप केले होते. इतकेच नव्हेतर बाबरने त्याच्या मित्रांच्या मदतीने माझा गर्भपात केल्याचाही आरोप या महिलेने केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT