IND vs PAK,Pakistan Playing 11 Saam tv
Sports

IND vs PAK, Asia Cup 2023: महामुकाबल्यासाठी पाकिस्तानची प्लेइंग ११ जाहीर! टीम इंडियाला धडकी भरवणाऱ्या गोलंदाजाची एन्ट्री

IND vs PAK,Pakistan Playing 11: भारतीय संघाविरूद्ध होणाऱ्या सामन्यासाठी पाकिस्तानने आपली प्लेइंग ११ जाहीर केली आहे.

Ankush Dhavre

Pakistan Playing 11 For Ind vs Pak Match:

आशिया चषकात रविवारी महामुकाबला खेळला जाणार आहे. सुपर ४ फेरीतील तिसरा सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

या हाय व्होल्टेज सामन्यासाठी पाकिस्तानने एक दिवसापूर्वीच प्लेइंग ११ ची घोषणा केली आहे. या संघात ४ वेगवान गोलंदाजांना स्थान दिलं गेलं आहे.

हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. या महत्वाच्या सामन्यासाठी पाकिस्तानच्या संघात ४ वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाजला बाहेर करून त्याच्या ऐवजी फहीम अशरफला या संघात खेळण्याची संधी देण्यात आली आहे.

४ वेगवान गोलंदाजांसह उतरणार मैदानात..

भारतीय फलंदाजांना आव्हान देण्यासाठी पाकिस्तानचा संघ ४ वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरणार आहे. ज्यात नसीम शाह, हॅरिस रउफ, शाहीन आफ्रिदी आणि फहीम अशरफ यांचा समावेश असणार आहे.

तर शादाब खान फिरकी गोलंदाजांचे नेतृत्व करताना दिसेल. त्याला साथ देण्यासाठी इफ्तिकार अहमद आणि सलमान आगा यांचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे.

पहिल्या सामन्यात जोरदार विजय...

पाकिस्तानचा सुपर ४ फेरीतील पहिला सामना बांगलादेश संघाविरुद्ध रंगला होता. या सामन्यात पाकिस्तानने दमदार खेळ करत विजय मिळवला होता. बाबर आझमने पुन्हा एकदा त्याच संघावर विश्वास दाखवला आहे.

पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा भारताचा टॉप ऑर्डर लवकरात लवकर बाद करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. (Latest sports updates)

या सामन्यासाठी अशी आहे पाकिस्तानची प्लेइंग ११ (Pakistan Playing 11)

बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, शादाब खान (उपकर्णधार), इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), फहीम अशरफ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हॅरीस रऊफ.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११ (Team India Playing 11 Prediction)

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल/ईशान किशन, हार्दिक पंड्या रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी/शार्दुल ठाकुर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT