पहिल्या वहिल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचा थरारा २००७ मध्ये रंगला होता. या सामन्यात माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती.
अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या सामन्यापूर्वी भारत- पाकिस्तान हे दोन्ही संघ साखळी फेरीतील सामन्यात देखील आमने सामने आले होते.
या सामन्याचा निकाल बॉल आऊटने लागला होता. हा ऐतिहासिक सामना १४ सप्टेंबर रोजी खेळवला गेला होता.
भारत-पाकिस्तान या दोन्ही सघांमध्ये रोमांचक सामना रंगला होता. मात्र हा सामना बरोबरीत समाप्त झाला होता. या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना बॉल आऊटचा थरार पाहायला मिळाला होता. भारतीय गोलंदाजांनी एकापाठोपाठ एक स्टम्प उडवत पाकिस्तानला धुळ चारली होती. या सामन्यातील बॉल आऊटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.
बॉल आऊटमध्ये नेमकं काय घडलं?
बॉल आऊटमध्ये भारतीय संघाकडून पहिला चेंडू टाकण्यासाठी वीरेंद्र सेहवाग गोलंदाजीला आला होता.
पाकिस्तानकडून गोलंदाजीला आलेला यासिर अराफत स्टम्प उडवण्याची संधी हुकवतो. दुसरा चेंडू टाकायला आलेला हरभजन सिंग देखील स्टम्प उडवला. पाकिस्तानकडून दुसरा चेंडू टाकण्यासाठी आलेल्या उमर गुलला देखील स्टम्प उ़डवता येत नाही.
भारतीय संघ २-० ने आघाडीवर होता. त्यावेळी तिसरा चेंडू टाकण्यासाठी रॉबिन उथप्पा गोलंदाजीला आला होता. त्याचा चेंडू देखील स्टम्पला जाऊन धडकला. यासह भारतीय संघाने ३-० ने विजयी आघाडी घेतली.
पाकिस्तानकडून तिसरा चेंडू टाकण्यासाठी शाहिद आफ्रिदीचा चेंडू देखील स्पम्पला स्पर्श न करताच निघून गेला. यासह बॉल आऊटमध्ये बाजी मारत भारतीय संघाने पाकिस्तानला धुळ चारली. (Latest sports updates)
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाने या सामन्यात २० षटकात ९ गडी बाद १४१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने देखील ७ गडी बाद १४१ धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून मिस्बाह उल हकने सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.