RCB  SAAM TV
Sports

Royal Challengers Bangalore: 23 एप्रिल RCB साठी अतिशय खास! याच दिवशी घडल्या होत्या 2 मोठ्या घटना

On This Day RCB: आजचा दिवस हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या.

Ankush Dhavre

IPL 2023: आज आयपीएल स्पर्धेत एक रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे. या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे. गेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाब किंग्ज संघावर विजय मिळवला होता. तर गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

त्यामुळे हा सामना राजस्थान रॉयल्स संघासाठी महत्वाचा असणार आहे. मात्र गेल्या सामन्यात विजय मिळवून देखील आज होणारा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या.

रॉयल चेलॅंजर्स बंगळुरू संघ हा आयपीएल स्पर्धेतील सर्वात मजबूत संघांपैकी एक आहे. एकापेक्षा एक दिग्गज खेळाडूंनी या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र या संघाला अजुनपर्यंत एकदाही जेतेपदावर नाव कोरता आले नाहीये.

यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ चांगली कामगिरी करतोय. मात्र आज म्हणजेच २३ एप्रिल रोजी होणाऱ्या सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची चिंता वाढली आहे. कारण याच दिवशी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासोबत २ मोठ्या घटना घडल्या होत्या. (Latest sports updates)

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या..

आयपीएल स्पर्धेला २००८ मध्ये सुरुवात झाली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने केलेला विक्रम कुठल्याही संघाला मोडता आला नाहीये.२३ एप्रिल २०१३ मध्ये बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पुणे वॉरियर्स इंडिया या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला होता.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील फलंदाज ख्रिस गेलने तुफान फटकेबाजी केली होती. त्याने ६६ चेंडूंचा सामना करत १३ चौकार आणि १७ षटकारांचा मदतीने १७५ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ५ गडी बाद २६३ धावांचा डोंगर उभारला होत. ही आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या आहे.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात छोटी धावसंख्या...

आयपीएल स्पर्धेत सर्वात मोठी धावसंख्या करण्याचा विक्रम हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या नावे आहे. तर सर्वात छोटी धावसंख्या करण्याचा विक्रम देखील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या नावे आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा डाव आजच्याच दिवशी म्हणजे २३ एप्रिल २०१७ रोजी अवघ्या ४९ धावांवर संपुष्टात आला होता. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला होता. ही आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात छोटी धावसंख्या आहे.

आजच्याच दिवशी या दोन्ही घटना घडल्या होत्या. आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सामना राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध रंगणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ चांगली कामगिरी करून विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cheesy White Sauce Maggi: चमचमीत नाश्ता हवाय? बनवा चीज व्हाईट सॉस मॅगी, सोपी आहे रेसिपी

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

अवकाळी पावसाने वाजवले स्मार्ट सिटीचे तीनतेरा; स्मार्ट सिटी की 'नरक' सिटी, पुणेकरांचा संताप

SCROLL FOR NEXT