Pakistan  Saam TV
Sports

T20 World Cup, Pak vs NZ : बाबर-रिझवान चमकले, न्यूझीलंडला लोळवून पाकिस्तान फायनलमध्ये

सेमिफायनलमध्ये न्यूझीलंडला ७ विकेटने पराभूत करून पाकिस्तानने फायनलमध्ये धडक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

T20 World Cup, Pak vs NZ : टी 20 वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ निश्चित झाला आहे. सेमिफायनलमध्ये न्यूझीलंडला 7 विकेटने पराभूत करून पाकिस्तानने फायनलमध्ये धडक

टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा सात गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. पाकिस्तानचा संघ 13 वर्षांनंतर टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चार गड्यांच्या मोबदल्यात 152 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकिस्तानने पाच चेंडूत तीन गडी गमावून 153 धावा करून लक्ष्य गाठले. आता अंतिम फेरीत पाकिस्तानचा सामना भारत-इंग्लंड सामन्यातील विजेत्याशी होणार आहे. (Cricket News)

न्यूझीलंडकडून डॅरेल मिशेलने 53 आणि केन विल्यमसनने 46 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने दोन विकेट्स घेतल्या. 153 धावांचा पाठलाग करताना बाबर आणि रिझवानच्या जोडीने पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी करत पाकिस्तानचा विजय निश्चित केला.

बाबरने 53 आणि रिझवानने 57 धावा केल्या. शेवटी हरिस रौफने 30 धावांची खेळी करत पाकिस्तानला विजयापर्यंत नेले. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने दोन विकेट्स घेतल्या. पाकिस्तानचा संघ 2009 नंतर प्रथमच T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Fort : जुन्नरच्या डोंगररांगांतील अभेद्य किल्ला, 'हे' ठिकाण जपतंय ऐतिहासिक ठेवा

Surat Bus Accident: सुरतमध्ये भीषण अपघात, दोन बस समोरासमोर धडकल्या; धडकेनंतर बसने घेतला पेट, ८ जणांचा जागीच मृत्यू

Best Exercises: डॉक्टरांनी सुचवले डायबेटीस, BP आणि हार्ट पेशंटसाठी 5 सर्वोत्तम व्यायाम

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी; मुरूम-तुगाव परिसर झोडपला

भाजप आमदाराचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT