ABHINAV BIRLA YANDEX
Sports

Aryaman Birla: विराट, धोनी नव्हे, हा आहे भारताचा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू! संपत्ती ऐकून धक्काच बसेल

Richest Cricketer Of India: तुम्हालाही वाटत असेल की, विराट कोहली एमएम धोनी हे सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहेत. मात्र हा तुमचा गैरसमज आहे.

Ankush Dhavre

गेल्या काही वर्षांत क्रिकेटपटूंची कमाईच्या बाबतीत उच्चांक गाठला आहे. सुरुवातीला क्रिकेटपटूंची कमाई खूप कमी असायची. मात्र आयपीएल सुरु झाल्यापासून भारतीय क्रिकेटपटूंची कमाई ही कोट्यवधींच्या घरात आहे.

भारतीय संघासाठी खेळणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआय पगार म्हणून वर्षाला कोट्यवधी रुपये देते. यासह खेळाडू जाहीरातीतूनही भरपूर कमाई करतात. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की, विराट, रोहित आणि सचिन हे सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू असतील. मात्र हा तुमचा गैरसमज आहे.

आम्ही तुम्हाला अशा एका क्रिकेटपटूबद्दल सांगणार आहोत, जो रोहित शर्मा, विराट कोहली आणि एमएस धोनीपेक्षाही श्रीमंत आहे. आम्ही बोलतोय, भारताचा क्रिकेटपटू आर्यमन बिरलाबद्दल. आर्यमन बिरलाबद्दल बोलायचं झालं, तर हा केवळ भारतातील नव्हे, तर जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे, असं म्हटलं तरी वागगं ठरणार नाही.

आर्यमन बिरलाचे (Aryaman Birla) वडील कुमार मंगलम बिरला हे भारतातील सर्वात श्रीमंत बिजनेसमनपैकी एक आहेत. बिझनेसमन कुटुंबातून येणाऱ्या आर्यमन बिरलाला क्रिकेटची प्रचंड आवड होती. त्याने आपल्या मेहनतीच्या बळावर देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्थान मिळवलं. मध्य प्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या या स्टार फलंदाजाने २०१९ मध्ये विश्रांती घेतली आणि त्यानंतर त्याला कमबॅक करताच आलं नाही.

एकूण संपत्ती किती?

माध्यमातील वृत्तानुसार, आर्यमन बिरलाच्या वडिलांची एकूण संपत्ती ७०००० कोटींच्या घरात आहे. या आकडेवारीसह तो भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू ठरला आहे.

आर्यमन बिरलाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला २०१७ मध्ये मध्यप्रदेश संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याला आपल्या कारकिर्दीदरम्यान प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९ तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये ४ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याला ४१४ धावा करता आल्या. यादरम्यान नाबाद १०३ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

SCROLL FOR NEXT