Neeru Dhanda Asian Games 2026 saam tv
Sports

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Asian Games 2026: भारतीय ट्रॅप शूटर नीरू ढांडाने एशियन गेम्स २०२६ मध्ये इतिहास रचत भारताला ५ वे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. ट्रॅप इंडिव्हिज्युअल इव्हेंटमध्ये गोल्ड जिंकणारी ती पहिली भारतीय महिला शूटर ठरली आहे.

Nandkumar Joshi

एशियन गेम्स २०२६ मधून भारतासाठी आनंदवार्ता आली आहे. मंगळवारी, २९ सप्टेंबर रोजी दिवसाच्या सुरुवातीला भारताला आधी रौप्यपदक मिळाले आणि त्यानंतर काही तासांतच देशाला पाचवे सुवर्णपदकही मिळाले. भारतीय महिला शूटर नीरू ढांडाने इंडिव्हिज्युअल ट्रॅप इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. ती एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला शूटर ठरली आहे.

नीरू ढांडाने आठ नेमबाजांच्या फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले होते. तिने कतारच्या खेळाडूसोबत मिळून ११८ गुण मिळवले. एशियन गेम्समधील हा एक नवीन विक्रम आहे. या स्पर्धेत भारताची आशिमा अहलावत १६ व्या आणि मनीषा कीर २३ व्या स्थानावर राहून बाहेर पडल्या. पण नीरूने आपला चमकदार खेळ सुरूच ठेवला आणि देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं.

वुमेन्स ट्रॅप टीम इव्हेंटमध्येही नीरूने मिळवून दिले रौप्यपदक

नीरू ढांडाने यापूर्वी जपानच्या आयची-नागोया येथे सुरू असलेल्या एशियन गेम्सच्या वुमेन्स ट्रॅप टीम इव्हेंटमध्येही भारताला रौप्यपदक मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली होती. या फायनलमध्ये नीरूने पुन्हा एकदा उत्कृष्ट खेळ दाखवत २८ चा स्कोअर केला. तर चीनची सन युनोंग २६ गुण मिळवू शकली आणि तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तर २१ चा स्कोअर करणाऱ्या हजर अब्दुलमलिकला कांस्यपदक मिळाले.

वर्ल्डकपमध्ये सुवर्णपदक

हरयाणाची २६ वर्षांची नीरू ढांडा हिनं वर्ल्डकपमध्ये ट्रॅप इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकलंय. इटलीत जुलैमध्ये झालेल्या शॉटगन वर्ल्डकप २०२६ मध्ये तिने २८ चा स्कोअर करून सुवर्णपदक आपल्या नावावर केले होते. यासोबतच तिने आशियाचा जुना २४ गुणांचा विक्रमही मोडला होता. तिच्यापूर्वी कोणत्याही भारतीय महिला शूटरने एशियन गेम्समध्ये ट्रॅप किंवा स्कीटच्या इंडिव्हिज्युअल इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकले नव्हते. पुरुषांच्या गटात रणधीर सिंह यांनी १९७८ च्या एशियन गेम्समध्ये ट्रॅप इव्हेंटचे ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले होते. तर, रोंजन सोढी यांनी २०१० च्या एशियन गेम्समध्ये डबल ट्रॅप इव्हेंटमध्ये भारतासाठी इंडिव्हिज्युअल सुवर्णपदक मिळवले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT