IND vs WI 5th T20I Saam tv
Sports

IND vs WI 5th T20I: सूर्यकुमार यादवची वादळी खेळी; टीम इंडियाचं वेस्ट इंडिजला १६६ धावांचं आव्हान

टीम इंडियाने २० षटकात 9 गडी गमावून १६६ धावांचं आव्हान दिलं आहे.

Vishal Gangurde

IND vs WI 5th T20I: भारत विरुद्ध वेस्ट इंडिजचा निर्णायक टी-२० सामना सुरू आहे. या मालिकेचा भारत विरुद्ध वेस्ट इंडिजचा अंतिम सामना अमेरिकेतील लॉडरहिल स्टेडियमवर सुरू आहे. करो या मरो सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र, टीम इंडियाच्या सूर्याकुमारने डाव सांभाळत अर्धशतक ठोकलं. टीम इंडियाने २० षटकात ९ गडी गमावून १६६ धावांचं आव्हान वेस्ट इंडिजला दिलं आहे. (latest Marathi News)

टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने पहिल्या षटकातच टीम इंडियाला धक्के दिले. वेस्ट इंडिजने यशस्वी जैसवाल आणि शुभमन गिलला बाद केले.

दोन गडी बाद झाल्यानंतर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवने संघाचा डाव सांभाळला. या दोघांनी पॉवरप्लेमध्ये तुफानी खेळी खेळली. वेस्ट इंडिजने या दोघांची फोडत तिलक वर्माला २७ धावांवर बाद केलं. त्यानंतर मैदानात उतरलेला संजू सॅमसनही फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही. संजू १३ धावा ठोकून तंबूत परतला.

सूर्याने आक्रमक फलंदाजी कायम ठेवत ३९ चेंडूत अर्धशतक ठोकलं. कर्णधार हार्दिक पंड्याही फारशी कमाल करू शकला नाही. हार्दिकने १८ चेंडूत १४ धावा ठोकल्या. पुढे सूर्याही पायचित झाला. त्याने ४५ चेंडूत ६१ धावा कुटल्या. कुलदीपही शून्य धावावर बाद झाला. टीम इंडियाने २० षटकात ९ गडी गमावून १६५ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT