World Cup 2023:  Saam tv
Sports

World Cup 2023: 'आम्ही सदैव...'; भारताच्या हातातून विश्वचषक निसटल्यानंतर मोदींनी दिला टीम इंडियाला दिलासा

World Cup 2023: भारताचा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाला दिलासा दिला आहे.

Vishal Gangurde

World Cup 2023:

विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून टीम इंडियावर मात केली. ऑस्ट्रेलियाचा संघ सहाव्यांदा विश्वविजेता झाला आहे. तर तिसऱ्यांदा भारताचं विश्वविजेता होण्याचं स्वप्न भंगलं आहे. भारताने आयोजित केलेल्या विश्वचषकात भारताचा पराभव झाल्याने निराशा पसरली आहे. भारताचा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाला दिलासा दिला आहे. (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत टीम इंडियाला दिलासा दिला. 'प्रिय टीम इंडिया, विश्वचषकादरम्यान तुमचं टॅलेंट आणि निश्चय लक्षवेधी होतं. तुम्ही खेळ भावनेने खेळला आहात. तुम्ही देशाला मोठा अभिमान मिळवून दिला आहात. आम्ही आज आणि सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत', अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाला दिलासा दिलासा. . ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विश्वचषकात टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी 'एक्स'वर टीम इंडियासाठी पोस्ट केली आहे. 'टीम इंडिया,तुम्ही विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली. तुम्ही जिंकला काय आणि हरला काय... आम्हा सर्वांचं तुमच्यावर प्रेम आहे. तसेच विश्वचषक जिंकल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचं अभिनंदन, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे

ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता

तत्पूर्वी, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर २४१ धावांनी मात केली. टीम इंडियाने दिलेलं आव्हान ऑस्ट्रेलियाने ४३ षटकात पूर्ण केलं. ऑस्ट्रेलिया संघ सहाव्यांदा एकदिवसीय फॉरमॅटमध्ये विश्वविजेता ठरला आहे.

विजेत्या संघावर पैशांचा पाऊस

विश्वचषक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियावर पैशांचा वर्षाव झाला. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला ४० लाख डॉलर (जवळपास) ३३.३३ कोटी रुपये) मिळाले आहेत. उप-विजेता भारतीय संघालाही २० लाख डॉलर्स ( जवळपास १६.६५ कोटी रुपये) मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhendi Facepack : नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी लावा भेंडीचा फेस पॅक

Relationship Tips: नवरा बायकोचं लग्नानंतर बोलणं कमी झालंय? 'या' टिप्स करा फॉलो, नातं होईल घट्ट

Bhakri Making Tips : भाकरी थापताना तुटते? टेन्शन घेऊ नका, फक्त 'या' सोप्या टिप्स वापरा

लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट, 2100 नाहीतर 4500 मिळणार|VIDEO

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये EVM आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आयडी कार्ड, शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

SCROLL FOR NEXT