mumbai indiasns Twitter
Sports

MI VS RCB: मुंबईचा जलवा कायम! हेली मॅथ्यूजच्या वादळी खेळीच्या बळावर मिळवला ९ गडी राखून विजय

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने बाजी मारत ९ गडी राखून विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

WPL 2023 MI VS RCB: विमेंस प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेतील चौथा सामना मुंबई इंडियन्स विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने बाजी मारत ९ गडी राखून विजय मिळवला आहे.

हा या स्पर्धेतील मुंबईचा सलग दुसरा विजय आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. (Latest sports updates)

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून एकाही फलंदाजाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. (MI VS RCB)

प्रथम फलंदाजी करताना रिचा घोषने सर्वाधिक २८ धावांची खेळी केली. तर श्रेयंका पाटीलने २३ आणि कर्णधार स्म्रीती मंधानाने २३ धावांचे योगदान दिले. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा डाव १८.४ षटकात १५५ धावांवर संपुष्टात आला.

या धावांचा पाठलाग करताना यस्तिका भाटिया २३ धावा करत माघारी परतली. मात्र त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या हेली मॅथ्यूजने नाबाद ७७ आणि सिवर ब्रंटने नाबाद ५५ धावांची खेळी करत मुंबईला जोरदार विजय मिळवून दिला. हा मुंबईचा सलग दुसरा विजय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL CSK vs DC: अखेर चेन्नई सुपर किंग्सनं उघडलं विजयाचं खातं; सॅमसन-ओव्हरटन ठरले हिरो

Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांच्या नातनं दिली आजीच्या प्रकृतीची अपडेट; काय म्हणाली जनाई?

Sahyadri Express Loot: सिग्नलमध्ये बिघाड करुन सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा; प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले

Sanju Samson Century: संजू सॅमसनचा जबरा तडाखा, फक्त ५२ चेंडूंत ठोकलं शतक; अनेक रेकॉर्ड उद्ध्वस्त, CSK चा धावांचा डोंगर

मोदी सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

SCROLL FOR NEXT