rohit sharma twitter
Sports

Rohit Sharma Viral Video: 'मुंबईचा राजा..रोहित शर्मा..',पुण्यात हिटमॅनची हवा; Video तुफान व्हायरल

IND vs NZ 2nd Test, Rohit Sharma Viral Video: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील रोहित शर्माचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

Rohit Sharma News In Marathi: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला आहे. दरम्यान हा सामना सुरु होताच, रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

हा सामना पुण्यात सुरु आहे. मात्र हवा मुंबईच्या राजाची पाहायला मिळाली आहे. हा सामना पाहण्यासाठी पुणेकरांनी पहिल्याच दिवशी तुफान गर्दी केली. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात फॅन्स मुंबईचा राजा रोहित शर्माच्या घोषणा देताना दिसून येत आहेत. वानखेडे मैदानावर जेव्हा सामना होतो, तेव्हा मुंबईकर या घोषणा देतात. मात्र आता पुण्यातही मुंबईचा राजा रोहित शर्माचा जयघोष पाहायला मिळाला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

भारतासाठी अतिशय महत्वाचा सामना

हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. मालिकेतील पहिला सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लगला होता. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव अवघ्या ४६ धावांवर आटोपला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने दमदार कमबॅक केलं, मात्र न्यूझीलंडने बाजी मारत हा सामना जिंकला.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत ( यष्टीरक्षक), सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, रविंद्र जडेजा, आर अश्विन

न्यूझीलंड - टॉम लेथम (कर्णधार), डेव्हन कॉनवे, विल यंग, रचिन रविंद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साऊदी, एजाज पटेल, विलियम ओ'रूर्क

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

SCROLL FOR NEXT