MS Dhoni चे रौद्र रुप, सरावा दरम्यान मारले उत्तुंग षटकार; पहा Video Saam Tv
Sports

MS Dhoni चे रौद्र रुप, सरावा दरम्यान मारले उत्तुंग षटकार; पहा Video

आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा 19 सप्टेंबरपासून युएई सुरू होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK vs MI) आणि मुंबई इंडियन्सचा संघ दुसऱ्या टप्प्यातला पहिला सामना खेळणार आहे.

वृत्तसंस्था

आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा 19 सप्टेंबरपासून युएई सुरू होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK vs MI) आणि मुंबई इंडियन्सचा संघ दुसऱ्या टप्प्यातला पहिला सामना खेळणार आहे. सध्या पॉइंट टेबलमध्ये सीएसके दुसऱ्या आणि मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. यावेळी चेन्नईच्या संघाने गेल्या टप्प्यात चांगली कामगिरी करून प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा कायम ठेवली आहे. आयपीएलसाठी यूएईला पोहोचणारा चेन्नईचा संघ पहिला आहे. संघाने विरगिकरण कालावधी पुर्ण केला आहे, आणि मैदानावर सराव देखील सुरू केला आहे. दरवेळी प्रमाणेच चाहते धोनीची फलंदाजी पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

गेल्या वर्षी धोनीने १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून संन्यास घेतला आहे. पण चाहत्यांना माहीला मैदानावर खेळताना पाहायचे आहे. गेल्या मोसमात धोनीची बॅट शांत होती. त्याचबरोबर त्याने या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात विशेष काही केलेले नाही. धोनीने या हंगामात ७ सामन्यात ३७ धावा केल्या आहेत. पण आता दुसऱ्या टप्प्यात धोनी नव्या रूपात आणि नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे.

सराव सत्रादरम्यान त्याने फलंदाजीची झलक दाखवली आहे. धोनी फलंदाजीचा सराव करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात माही गोलंदाजांविरुद्ध लांब षटकार मारताना दिसत आहे. फलंदाजी करताना धोनी त्याच्या जुन्या शैलीत दिसत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT