Maharashtra Kesari, Ramdas Tadas, Balasaheb Landge, wrestling federation of india.  Saam Tv
Sports

महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयाेजन वादात; ज्येष्ठ क्रीडा संघटक बाळासाहेब लांडगेंवर खासदार तडस यांचा गंभीर आराेप

यंदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे जिल्ह्यात हाेण्याची शक्यता आहे.

साम न्यूज नेटवर्क

- चेतन व्यास

Maharashtra Kesari : कुस्तीगीर परिषदेचं अधिवेशन म्हणजेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा अधिकार बाळासाहेब लांडगे (Balasaheb Landge) यांना नाही. भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केली आहे. मामासाहेब माेहाेळ यांचे नातेवाईक मुरलीधर (murlidhar mohol) यांना यंदाच्या अधिवेशनाचा मान देण्यात आला आहे. परंतु लांडगे यांना माेहाेळही चालत नाही आणि आम्ही असे मत खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयाेजनावरुन रंगलेल्या वादावर व्यक्त केले. (Maharashtra Kesari Latest Marathi News)

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखासत झाली आहे. दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनावर ज्येष्ठ क्रीडा संघटक बाळासाहेब लांडगे हे ठाम राहिले आहेत. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात मानाची समजल्या जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयाेजन वादाच्या भाेव-यात आले आहे.

दरम्यान याबाबत खासदार रामदास तडस म्हणाले बाळासाहेब लांडगे यांना स्पर्धा आयाेजनाचा कोणताही अधिकार राहिलेला नाही. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अगोदरच बरखास्त झाली आहे. ऑल इंडिया कुस्तीगीर संघान ती बरखास्त केली आहे. बाळासाहेब लांडगे यांनी भ्रष्टाचार केला. दहा वर्षात राष्ट्रीय स्पर्धा आयाेजित केल्या नाहीत. महासंघाच्या पत्रांना उत्तर दिलं नाही. त्यामुळे बाळासाहेब लांडगे महासचिव असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषद बरखास्त झाली. (Maharashtra News)

दरम्यान नव्याने निवडणुका झाल्या. त्यात मी अध्यक्षपदाचा उमेदवार होतो. त्यानंतर ते काेर्टात गेले. आम्हांला न्यायालयाने निकाल जाहीर करु नका असे सांगितले हाेते. आम्ही कोर्टाचा मान राखला, निवडणुका अविरोध झाल्या पण निकाल जाहिर केला नाही असेही खासदार तडस यांनी नमूद केले. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT