team india saam tv
Sports

Mohammed Siraj Ruled Out: टीम इंडियाला मोठा धक्का! वनडे मालिकेतून संघातील हुकमी एक्का बाहेर! मोठं कारण आलं समोर

IND vs WI 1st ODI: या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

Ankush Dhavre

Mohammed Siraj Ruled Out Ind vs WI ODI Series: भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. नुकताच या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगली होती. या मालिकेत भारतीय संघाने १-० ने विजय मिळवला होता. वनडे मालिकेतील पहिला सामना आज बार्बाडोसच्या मैदानावर रंगणार आहे.

दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज मोहम्मद सिराज वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याला या मालिकेतून विश्रांती दिली गेली आहे. (Mohammed Siraj Ruled Out)

हे खेळाडू परतले मायदेशी...

माध्यमातील वृत्तानुसार, अजिंक्य रहाणे, आर अश्विन, केएस भरत आणि नवदीप सैनी हे खेळाडू मायदेशी परतले आहेत. हे खेळाडू वेस्टइंडीजविरुद्धच्या कसोटी संघाचा भाग होते. मात्र आता वनडे मालिका सुरु होणार असल्याने हे खेळाड माघारी परतले आहेत.

या खेळाडूंसह मोहम्मद सिराज देखील माघारी परतला आहे. बीसीसीआयने त्याचा वर्कलोड पाहत हा निर्णय घेतला आहे. मात्र सिराज वनडे मालिकेतून बाहेर झाल्याची कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Latest sports updates)

सिराजच्या अनुपस्थितीत कोणाला मिळणार स्थान?

मोहम्मद सिराज हा सध्या भारतीय संघातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. मात्र आता तो बाहेर झाल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या अनुपस्थितीत जयदेव उनाडकट किंवा मुकेश कुमारला संघात स्थान दिले जाऊ शकते. भारतीय संघासत शार्दूल ठाकूर आणि उमरान मलिक हे प्रमुख वेगवान गोलंदाज आहेत.

पहिल्या वनडेसाठी अशी असु शकते भारतीय संघाची प्लेइंग ११ (Team India Playing 11):

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन/ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव/अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर,मुकेश कुमारय जयदेव उनाडकट आणि उमरान मलिक.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dearness Allowance: मोठी बातमी ! राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना होळीचं गिफ्ट; ८ लाख निवृत्ती वेतनधारकांनाही होणार मोठा आर्थिक फायदा

IND vs ZIM T20 WC: झिम्बाब्वेचा दारूण पराभव; भारत उपांत्य फेरीपासून एक पाऊल दूर; हार्दिक बनला विजयाचा हिरो

रश्मिका मंदाना अन् विजय देवरकोंडा अकडले लग्न बंधनात; कपलची एक कृती ठरली चर्चेचा विषय

Rajya Sabha Election: उद्धव ठाकरे राज्यसभेवर जाणार? मविआमध्ये पडद्यामागे काय घडतेय?

Zilla Parishad: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सदस्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT