Mohammed Shami News Saam Tv
Sports

IND vs AUS 2nd Test: मोठ्या मनाचा शमी! क्रिकेट चाहत्यासोबत धक्काबुक्की होत असताना मदतीला आला धावून - VIDEO

एका क्रिकेट चाहत्याने सेक्युरिटी गार्डला चकमा देत मैदानात प्रवेश केल्याचे पाहायला मिळाले होते.

Saam TV News

IND vs AUS 2nd Test: भारतात क्रिकेटला धर्म मानले जाते. त्यामुळे आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला भेटण्यासाठी चाहते कुठलीही हद्द पार करत असतात. सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील दुसरा कसोटी सामना हा दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरु आहे.

हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक हजारोंच्या संख्येने मैदानात उपस्थित आहेत. दरम्यान एका क्रिकेट चाहत्याने सेक्युरिटी गार्डला चकमा देत मैदानात प्रवेश केल्याचे पाहायला मिळाले आहे.

प्रेक्षकाने मैदानात प्रवेश करताच, सेक्युरिटी गार्ड्स त्याच्या मागे धावले आणि त्याला धक्काबुकी करत मैदानाच्या बाहेर घेऊन गेले. त्याला बाहेर घेऊन जात असताना, एकीकडे भारतीय खेळाडू केवळ पाहत उभे होते. तर त्याचवेळी सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेला मोहम्मद शमी त्याच्या मदतीला धावत आला. (Latest Sports Updates)

मोहम्मद शमीने (Mohammed Shami ) त्या सेक्युरिटी गार्ड्सला धक्काबुक्की न करण्याचा सल्ला दिला. तसेच चाहत्याला मैदानाबाहेर जाण्यास सांगितले. यापूर्वी देखील अनेकदा असे घडले आहे. प्रेक्षक सामना पाहण्यासाठी येतात. तसेच संधी मिळताच ते मैदानात प्रवेश करत असतात.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर ऑस्टेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. सूर्यकुमार यादवला संघाबाहेर करत श्रेयस अय्यरला संधी दिली गेली आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११ :

केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, केएस भरत, अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! हे आयडी लगेचच तयार करा, अन्यथा पीएम किसान योजनेचा हप्ता विसरा

Chhattisgarh : ३६ किल्ल्यांची भूमी छत्तीसगड! भारतात लपलेला ऐतिहासिक खजिना, तुम्ही कोण-कोणते किल्ले पाहिलात?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचे भाजप कार्यालयावर आंदोलन

Good News : LPG दरात झाली मोठी घट, ऑटो चालकांना मोठा दिलासा, पाहा आता किती रूपयांना मिळणार?

पांढरे केस होतील काळे! तुरटी आणि आवळ्याचा 'हा' सोपा उपाय ठरेल फायदेशीर

SCROLL FOR NEXT