Mohammed Shami Mohammed Shami
Sports

Mohammed Shamiचा किलर लूक, लाला हेअरस्टाईलसाठी मोजले लाखभर रुपये!

Mohammed Shami : मोहम्मद शामी याने आलिम हकीम याच्याकडून केस कापले आहेत. त्याची नवी हेअरस्टाईल सध्या चर्चेत आहे.

Namdeo Kumbhar

Mohammed Shami Aalim Hakim : मोहम्मद शामी टीम इंडियात (Team India) कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. दुखापतीनंतर त्याने फिटनेसवर लक्ष केंद्रीत केलेय. त्याने नेट्समध्ये कसून सराव केला आहे. बांगलादेशविरोधात (IND vs BAN) होणाऱ्या कसोटी मालिकेत शामी (Mohammad Shami) कमबॅक करण्याची शक्यता आहे. पण शामी सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. शामी सध्या त्याच्या हेअरस्टाईलमुळे चर्चेत आहे. मोहम्मद शामी याने आलिम हकीम याच्याकडून केस कापले आहेत. त्याची नवी हेअरस्टाईल सध्या चर्चेत आहे.

आलिम हकीम याच्याकडे मोहम्मद शामी याच्याशिवाय विराट कोहली आणि महेंद्र सिंह धोनी यांनीही हेअरकट केलेत. रिपोर्ट्सनुसार, आलिम हकीम एका सेशलसाठी एक लाख रुपये चार्ज करतात. शामीने नव्या हेअरस्टाईलचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहत्यांना शामीचा नवा हेअरकट प्रचंड आवडलाय. लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

आलिम हकीम हे भारतामधील प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट म्हणून ओळखलं जाते. मोहम्मद शामीने त्याच्याकडे केस कापले आहेत. शामीने नव्या हेअरस्टाईलचा फोटोही त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. शामीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "नवीन रूप, तीच धमाल."

पाहा मोहम्मद शामीची पोस्ट -

अलीम हकीम याने टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंची हेअरस्टाईल सेट केली. ब्रूट इंडियाशी बोलताना त्याने सांगितले की एका सेशनसाठी तो सुमारे एक लाख रुपये चार्ज करतो. विराट कोहलीच्या हेअरकटनंतर आलिम प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर युवराज सिंग, सूर्यकुमार यादव, बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी, रणवीर सिंग, विकी कौशल आणि हार्दिक पांड्या यांच्यासह अनेकांनी त्याच्याशी संपर्क साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

'ऑपरेशन लोटस'ला तडा, या माजी आमदाराच्या पक्ष प्रवेशाला विरोध, भाजप कार्यकर्तांचे आंदोलन

Diwali bonus issue : बोनस दिला नाही, कर्मचारी संतापले, असं काही केलं की मालकाला बसला शॉक | VIDEO

Raigad Politics : गोगावलेंचा तटकरेंना जोरदार धक्का, कट्टर नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Kolhapur Mystery : बिबट्याचा हल्ला की घातपात? कोल्हापुरात रहस्यमय मृत्यू, कंक दांपत्याच्या मृत्यूमागे गुढ वाढले, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT