mitchell santner twitter
Sports

Mitchell Santner Catch: कहरच केला.. मिचेल सँटनरने मागच्या दिशेने धावत घेतला भन्नाट झेल - VIDEO

Mitchell Santner Catch Video: इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या द हंड्रेड लीग स्पर्धेत मिचेल सँटनरने भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

कॅचेस विन द मॅचेस, असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. एक कॅच तुम्हाला मॅच जिंकू शकते. तर एक कॅच सोडल्यामुळे मॅच हातातून निघूनही जाते. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये सूर्यकुमार यादवची कॅच पकडली होती.

ही कॅच निर्णायक ठरली होती. या कॅचमुळे भारतीय संघाने हातून निसटलेला सामना जिंकला होता. दरम्यान इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या द हंड्रेड लीगमध्येही मिचेल सँटनरने (Mitchell Santner) असा काही झेल टिपला आह, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

द हंड्रेड लीग स्पर्धेत नॉर्दर्न सुपरचार्जर्स आणि लंदन स्पिरीट हे दोन्ही संघ आमनेसामने होते. या सामन्यात नॉर्दर्न सुपरचार्जर्स संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लंदन स्पिरीट संघाकडून मायकल पेपर आणि किटन जेनिंग्स ही जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आली होती. सामन्यातील ११ व्या चेंडूवर मायकल पेपरने मिड ऑनच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मिचेल सँटनर मिड ऑनला क्षेत्ररक्षण करत होता.

फलंदाजाने शॉट मारताच चेंडू उंच हवेत गेला. त्यावेळी मिचेल सँटनर मागच्या दिशेने धावत होता. समोरच्या दिशेने धावत जाऊन कॅच पकडणं इतकं कठीण नसतं. मात्र मागच्या दिशेने धावत कॅच पकडणं हे खूप कठीण आहे. मात्र मिचेल सँटनरने मागच्या दिशेने धाव घेत डाइव्ह मारली आणि भन्नाट कॅच पकडली.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लंडन स्पिरीट संघाने १०० चेंडूत ८ गडी बाद १११ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना नॉर्दर्न सुपरचार्जर्स दमदार सुरुवात केली.

शानदार सुरुवात मिळाल्यानंतर पावसाने हजेरी लावली. ज्यावेळी हा सामना थांबला त्यावेळी नॉर्दर्न सुपरचार्जर्सचा संघ पुढे होता. त्यामुळे या संघाला विजयी घोषित करण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT