rohit sharma selfie saam tv
Sports

Rohit Sharma Selfie: रोहीत सोबत सेल्फी काढायला गेला अन्... चाहत्याला सेल्फी घेणं पडलं महागात- VIDEO

MI VS RR Viral Video: रोहित शर्माचा सामना झाल्यानंतरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

MI VS RR IPL 2023: आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील १००० वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने जोरदार कामगिरी करत राजस्थान रॉयल्स संघावर जोरदार विजय मिळवला.

सलग ३ षटकार मारणारा टीम डेव्हिड या सामन्याचा हिरो ठरला. तर बड्डे बॉय रवी शास्त्रीला हवी तशी कामगिरी करता आली नाही.

स्वस्तात माघारी परतलेल्या रोहित शर्माचा सामना झाल्यानंतरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

या ऐतिहासीक सामन्यात विजय मिळवल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा चाहत्यांचे अभिवादन स्वीकारण्यासाठी स्टँड्सजवळ पोहोचला. त्यावेळी त्याने आपल्या चाहत्यांसोबत सेल्फी घेतले, ऑटोग्राफ दिले. तसेच चाहत्यांसोबत गप्पा देखील मारल्या. हे सर्व सुरु असताना त्याने एक मजेशीर कृत्य देखील केले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. (Latest sports updates)

तर झाले असे की, रोहित शर्मा पॅव्हेलियनमध्ये जात असताना काही फॅन्स त्याला सेल्फी काढण्यासाठी आग्रह करतात. एक चाहता त्याला सेल्फी घेण्यासाठी त्याच्या हातात फोन देतो, रोहित सेल्फी घेतो मात्र फोन न देताच पुढे निघून जातो. हे पाहून तो चाहता त्याला आवाज देतो आणि म्हणतो की, 'अरे रोहित माझा फोन..कुठे घेऊन चाललास फोन माझा प्लीज दे ना..' त्यावेळी हिटमॅन पुन्हा माघारी येतो आणि त्या चाहत्याला फोन परत करतो. हा एक मस्करीचा भाग होता.

मुंबई इंडियन्स संघाने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर चाहते देखील मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

अंतिम षटकात टीम डेविडचे षटकार..

या सामन्यात मुंबईला २१३ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना मुंबईला अंतिम षटकात १७ धावांची गरज होती. अंतिम षटकात १७ धावांचा पाठलाग करताना फलंदाज दबावात असतो. मात्र यावेळी गोलंदाजी करत असलेला जेसन होल्डर दबावात असल्याचे दिसून आले. अंतिम षटक सुरू होण्यापूर्वी असे वाटत होते की, राजस्थान रॉयल्स हा संघ जिंकणार. मात्र पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर टीम डेविडने षटकारांची हॅट्रिक केली आणि आपल्या संघाला जोरदार विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्याच्या भोरमधील ऐतिहासिक 141 वर्ष जूना रामबाग येथील दगडी पूल पाडला

Test Retirement: भारताच्या मॅचविनर वेगवान गोलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती, कसोटी क्रिकेटला अलविदा

Saturday Horoscope : 7 नोव्हेंबरला ग्रहांची मोठी चाल! मेष ते मीन, कोणाचं नशीब चमकणार? वाचा आजचे राशिभविष्य

गोकुळचा तिढा आणखी वाढणार? शासननियुक्त सदस्यांचा वाद कोर्टात जाणार?

बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यात नवा ट्विस्ट; वैभवच्या कुटुंबीयांचा घातपाताचा संशय

SCROLL FOR NEXT